मुंबई - फेब्रुवारी महिना म्हटलं की, सुरु होते ती 'व्हॅलेन्टाईन डे'ची धामधुम. १४ फेब्रुवारीला साजरा करण्यात येणारा 'व्हॅलेन्टाईन डे' म्हणजे प्रेमीयुगुलांसाठी आपलं प्रेम व्यक्त करण्याची एक पर्वणीच असते. त्यासाठी आठवडाभरापासून व्हॅलेन्टाईनची तयारी देखील पाहायला मिळते. कलाविश्वातही सध्या प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' सोनाली कुलकर्णी हिने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. दुबईच्या कुणाल बेनोडेकरसोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याचे तिने सांगितले आहे. सध्या ती त्याच्यासोबत आपला व्हॅकेशन मूड एन्जॉय करत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कुणाल हा दुबईमध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहे. लवकरच सोनाली त्याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. सोनाली सध्या सुट्ट्यांचा आनंद घेताना पाहायला मिळते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तिने तिच्या ट्रीपचे बरेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सोनाली काही दिवसांपूर्वीच 'हिरकणी', 'विक्की वेलिंगकर' आणि 'धुरळा' या चित्रपटात झळकली. या तिनही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.