मुंबई - आपल्या बाळाच्या ओढीने कशाचीही पर्वा न करता शिवरायांचा गड उतरणाऱ्या हिरकणीची शौर्यकथा 'हिरकणी' या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात 'हिरकणी'च्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. टीझरनंतर प्रेक्षकांना ट्रेलरची आतुरता होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
'हिरकणी'चा ट्रेलर बघताच अंगावर काटा उभा राहतो. आपल्या बाळाला भेटण्यासाठी हिरकणी कश्याप्रकारे गडाच्या कड्यावरुन खाली उतरते, याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. घरी परतण्यासाठी तिला उशीर होतो. संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झाल्यावर थेट सकाळीच उघडण्यात येणार असतो. गडाचे दरवाजे बंद झाल्यावर हिरकणी मागे पुढे न पाहता थेट गड उतरण्याचा निर्णय घेते. आपल्या बाळाप्रती असलेली तिची ओढ, तिची व्याकुळता या ट्रेलरमध्ये अगदी उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा- 'हिरकणी'च्या भूमिकेसाठी सोनालीची 'अशी' झाली निवड
हिरकणीची शौर्यगाथा या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे चाहतेही या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाली भव्यदिव्य असलेले शिवराज्याभिषेकाचे गाणेही सोशल मीडियावर हिट झाले आहे.
सोनाली आणि अमित या दोघांनी सिनेमातील भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. भाषेपासून ते देहबोलीपर्यत आणि शेणात हात घालून घर सारवणे, भाकऱ्या थापणे, चूल फुंकणे, अश्या अनेक गोष्टी सोनालीने मन लावून केल्या आहेत.
हेही वाचा -प्रत्येक आई असतेच हिरकणी, प्रसाद ओक घेऊन येतोय 'हिरकणी'ची कथा
अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. २४ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.