ETV Bharat / sitara

हिरकणी टीझर: बाळाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या आईची शौर्यगाथा - hirkani release date

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात हिरकणीच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील तिचा लूक प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या टीझरमध्येही तिची दमदार झलक पाहायला मिळते.

हिरकणी टीझर: बाळाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या आईची शौर्यगाथा
author img

By

Published : Oct 3, 2019, 11:06 AM IST

मुंबई - आपल्या बाळाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या हिरकणीची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या बाळासाठी हिरकणी शिवरायांचा मजबूत असलेला गड उतरली होती. पुढे तिच्या नावावरुनच त्या गडाला 'हिरकणी गड' असे नाव देण्यात आले होते. हिरकणीची हिच शौर्यगाथा दिग्दर्शक तसेच अभिनेता प्रसाद ओकने आपल्या आगामी 'हिरकणी' चित्रपटात मांडली आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शिक करण्यात आला आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात हिरकणीच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील तिचा लूक प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या टीझरमध्येही तिची दमदार झलक पाहायला मिळते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -हृतिक - टायगरच्या 'वॉर'नं पहिल्याच दिवशी रचला इतिहास, केली इतकी कमाई

हिरकणी आपल्या बाळाला घरी सोडून गडावर गेलेली असते. मात्र, घरी परतण्यासाठी तिला उशीर होतो. संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झाल्यावर थेट सकाळीच उघडण्यात येणार असतो. या टीझरमध्ये हेच प्रसंग पाहायला मिळतात. गडाचे दरवाजे बंद झाल्यावर हिरकणी मागे पुढे न पाहता थेट गड उतरण्याचा निर्णय घेते. आपल्या बाळाप्रती असलेली तिची ओढ, तिची व्याकुळता या टीझरमध्ये अगदी उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे.

हेही वाचा -कवयित्री अश्विनी शेंडेंनी 'शब्दांच्या कॅफे'तून उलगडला प्रवास

हिरकणीची शौर्यगाथा या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे चाहतेही या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाली भव्यदिव्य असलेले शिवराज्याभिषेकाचे गाणेही सोशल मीडियावर हिट झाले आहे. अभिनेता स्वप्नील जोशीनेही हा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन सोनालीला आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
२४ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हेही वाचा -'पुणे तिथे काय उणे' : पीएमपी बस थांबवून तरुणीने केला 'टिकटॉक' व्हिडिओ

Intro:Body:

nnमुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी ne

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.