मुंबई - गायिका सोना महापात्रा हिला पॅरिसमध्ये इस्रोद्वारे भारतीय सॅटेलाईट लॉन्चसाठी फ्रेंच स्पेस एजन्सी एरियनने आमंत्रीत केले आहे.
याबद्दल बोलताना सोना म्हणाली, ''लहानपणापासून मला स्पेसच्याबद्दल ओढ आहे, हे मला ओळखणाऱ्यांना माहिती आहे. वयाच्या ६ ते १४ वर्षांपर्यंत हा प्रश्न पडायचा की जेव्हा मोठे होऊ तेव्हा काय व्हायचे. याचे उत्तर हेच होते एस्ट्रॉनॉटपासून ते खगोलशास्त्री असे काहीही बनायचे होते.''
''माझे वडिल भारतीय नौसेनेमध्ये एस्ट्रो अँड रडार नेविगेशनमध्ये नेविगेशन स्पेशालिस्ट आणि इन्स्ट्रक्टर असल्यामुळे तारकांशी चांगला संबंध राहिला आहे. ते आम्हा तिन्ही बहिणींना अंगणात बसवून तारे दाखवत असत. मी शिक्षणाच्या बाबतीत वेगळ्या वाटेने गेले आणि इंजिनिअरींचे शिक्षण सुरू केले. शेवटी माझी ओढ संगीतक्षेत्राकडे वळली. असे असले तरी स्पेसबद्दलचे माझे आकर्षण कमी झालेले नाही. ''
भारत आणि युरोपिय स्पेस एजन्सी एरियनस्पेस २०२० च्या स्पेस मिशनची सुरूवात करण्यासाठी एक कम्यूनिकेशन सॅटेलाईट जीएसएटी ३० लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
३३५७ किलोग्राम वजनाचे जीएसएटी ३० एक भारतीय सॅटेलाईट आहे. एरियन ५ रॉकेटच्या सहाय्याने १७ जानेवारीला लॉन्च केले जाणार आहे.