ETV Bharat / sitara

स्मिता पाटील यांच्या नावामागचं रहस्य ते त्यांची शेवटची इच्छा, अशी आहे कथा - smita patil last wish

स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोंबर १९५६ साली झाला होता. स्मिता यांच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही लाईमलाईटमध्ये चर्चा झाली.

स्मिता पाटील यांच्या नावामागचं रहस्य ते त्यांची शेवटची इच्छा, अशी आहे कथा
author img

By

Published : Oct 17, 2019, 8:54 AM IST

Updated : Oct 17, 2019, 11:54 AM IST

मुंबई - आपल्या सशक्त अभिनयानं सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज जन्मदिवस आहे. आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने सर्वांवर छाप पाडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये स्मिता पाटील यांचं नाव अग्रस्थानी होतं. स्मिता पाटील या सौंदर्यांचे निकष बदलणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणल्या गेल्या. अवघ्या १० वर्षांच्या सिनेकारकिर्दीतील त्यांचं आयुष्य बऱ्याच घटनांमुळे चर्चेत राहिलं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात हे काही किस्से...

स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोंबर १९५६ साली झाला होता. स्मिता यांच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही लाईमलाईटमध्ये चर्चा झाली. विशेषत: अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली.

असं पडलं 'स्मिता' हे नाव -

स्मिता पाटील यांच्या नावामागेही एक किस्सा आहे. त्यांची आई विद्याताई पाटील यांनी स्मिता यांच्या सुंदर हास्यामुळे त्यांचं नाव 'स्मिता' असं ठेवलं होतं. पुढे हेच नाव त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं ठरलं. तसंच, त्यांचं हास्यदेखील त्यांच्या सौंदर्याचा अविभाज्य घटक बनला.

स्मिता त्यांच्या गंभीर अभिनयामुळे ओळखल्या जात असत. मात्र, फार कमी लोकांना माहिती असेल, की पडद्यावर गंभीर भूमिका साकारणाऱ्या स्मिता या खऱ्या आयुष्यात मात्र, खूप मस्तीखोर होत्या.स्मिता यांनी साकारलेले चित्रपट त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरले. त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 'मंथन', 'मिर्च मसाला', 'अर्थ', यांसारख्या चित्रपटांचा विशेष उल्लेख केला जातो.

हेही वाचा -दिवाळीत उलगडणार 'अंकुश-शिवानी-पल्लवी'च्या मिसकॉलवाल्या मैत्रीचे रहस्य

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी स्मिता पाटील या मुंबई दुरदर्शनमध्ये मराठी बातम्यांचं निवेदन करत असत. वृत्त निवेदिका म्हणून त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. पुढे अरुण खोपकर यांच्या डिप्लोमा चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र, श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'चरणदास चोर' हा चित्रपट त्यांचा पदार्पणीय चित्रपट मानला जातो.

पुढे त्यांच्या आणि राज बब्बर यांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांची खूप चर्चा झाली. राज बब्बर हे विवाहित होते. तरीही ते स्मिता यांच्या सौंदर्यावर भाळले होते. त्यामुळे राज बब्बर यांचं लग्न स्मिता यांच्यामुळे तुटलं, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. स्मिता यांची आईदेखील त्यांच्या या नात्यावर नाराज होती.

हेही वाचा - भन्साळींच्या 'गंगुबाई काठीवाडी'मध्ये 'लेडी डॉन' साकारणार आलिया भट्ट

'ही' होती शेवटची इच्छा -

स्मिता यांना ब्रेन इन्फेक्शन झालं होतं. त्यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी त्यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल माहिती दिली होती. स्मिता यांनी दीपकला सांगितलं होतं, की जेव्हा त्यांचा मृत्यू होईल, तेव्हा त्यांना एखाद्या नवरीप्रमाणे सजवण्यात यावं. १३ डिसेंबर १९८६ साली त्याचं आजारामुळे निधन झालं. त्यांच्या याच इच्छेचा मान ठेऊन त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांना नवरीप्रमाणे सजवण्यात आलं होतं.

Intro:Body:

स्मिता त्यांच्या गंभीर अभिनयामुळे ओळखल्या जात असत. मात्र, फार कमी लोकांना माहिती असेल, की पडद्यावर गंभीर भूमिका साकारणाऱ्या स्मिता या खऱ्या आयुष्यात मात्र, खूप मस्तीखोर होत्या.

स्मिता यांनी साकारलेले चित्रपट त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरले. त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 'मंथन', 'मिर्च मसाला', 'अर्थ', यांसारख्या चित्रपटांचा विशेष उल्लेख केला जातो.

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी स्मिता पाटील या मुंबई दुरदर्शनमध्ये मराठी बातम्यांचं निवेदन करत असत. वृत्त निवेदिका म्हणून त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. पुढे अरुण खोपकर यांच्या डिप्लोमा चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र, श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'चरणदास चोर' हा चित्रपट त्यांचा पदार्पणीय चित्रपट मानला जातो.

पुढे त्यांच्या आणि राज बब्बर यांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांची खूप चर्चा झाली. राज बब्बर हे विवाहित होते. तरीही ते स्मिता यांच्या सौंदर्यावर भाळले होते. त्यामुळे राज बब्बर यांचं लग्न स्मिता यांच्यामुळे तुटलं, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. स्मिता यांची आईदेखील त्यांच्या या नात्यावर नाराज होती.

'ही' होती शेवटची इच्छा -

स्मिता यांना ब्रेन इन्फेक्शन झालं होतं. त्यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी त्यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल माहिती दिली होती. स्मिता यांनी दीपकला सांगितलं होतं, की जेव्हा त्यांचा मृत्यू होईल, तेव्हा त्यांना एखाद्या नवरीप्रमाणे सजवण्यात यावं. १३ डिसेंबर १९८६ साली त्याचं आजारामुळे निधन झालं. त्यांच्या याच इच्छेचा मान ठेऊन त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांना नवरीप्रमाणे सजवण्यात आलं होतं.

Conclusion:
Last Updated : Oct 17, 2019, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.