ETV Bharat / sitara

'वेडिंगचा शिनेमा'साठी ऑनलाइन ऑडिशनद्वारे झाली गायकांची निवड - sourabh shirsath

“कुनीबी कसबी घालुदे पिंगा, बाशिंगाचा कळतोच इंगा” असे बोल असलेले हे गाणे आहे. सलील कुलकर्णी यांनी हे बोल फेसबुकच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात ऑनलाइन टाकले होते

सौरभ शिरसाठ आणि कोल्हापूरची स्वरूपा बर्वे यांची निवड
author img

By

Published : Mar 22, 2019, 10:27 AM IST

मुंबई - मराठी चित्रपटांमध्ये अनेक नवनवे प्रयोग गेल्या काही वर्षांमध्ये होत आहेत. पण प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘वेडिंगचा शिनेमा’च्या टीमने केलेला हा प्रयोग याआधी कुठे झालेला नाही. या चित्रपटातील एक गाणे हे चक्क ऑनलाइन ऑडीशनच्या माध्यमातून गायकांची निवड करून ध्वनिमुद्रित केले जात आहे. देश आणि परदेशातील गायकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर तब्बल ४१२ स्पर्धकांमधून दोघांची निवड करण्यात आली असून त्याचे ध्वनीमुद्रण लवकरच होणार आहे.

माजलगावचा सौरभ शिरसाठ आणि कोल्हापूरची स्वरूपा बर्वे यांची निवड या गाण्यासाठी केली गेली आहे. “कुनीबी कसबी घालुदे पिंगा, बाशिंगाचा कळतोच इंगा” असे बोल असलेले हे गाणे आहे. सलील कुलकर्णी यांनी हे बोल फेसबुकच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात ऑनलाइन टाकले होते. त्यानंतर या गाण्याचे व्हीडिओ अपलोड करायचे आवाहन होतकरू गायकांना केले. त्याला देश आणि परदेशातून म्हणजे अगदी ओमान, बाहरीन, अमेरिका, कॅनडासारख्या देशांमधून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमधून आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून सर्व वयोगटातील होतकरू गायकांनी आपले व्हिडिओ अपलोड केले होते.

हा सिनेमा येत्या १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची तीन गाणी याआधीच प्रदर्शित करण्यात आली आहेत. या वेगळ्या प्रयोगाला मिळालेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल डॉ. सलील कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले आहे. सिनेमात शिवाजी साटम, अलका कुबल, मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर या आघाडीच्या कलाकारांबरोबरच भाऊ कदम, प्रवीण तरडे, हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आता सिनेमाच्या प्रमोशनसाठी वापरलेला हा फंडा सिनेमाला किती फायदेशीर ठरतो ते कळेलच, पण या दोघांनी गायलेलं गाणं सुपरहिट ठरलं तर ते त्यांच्या करिअरला कलाटणी देणारं असेल.

Intro:मराठी चित्रपटांमध्ये अनेकानेक प्रयोग गेल्या काही वर्षांमध्ये होत आले आहेत. पण प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णी यांच्या ‘वेडिंगचा शिनेमा’च्या टीमने केलेला हा प्रयोग याआधी कुठे झालेला नाही. या चित्रपटातील एक गाणे हे चक्क ऑनलाइन ऑडीशनच्या माध्यमातून गायकांची निवड करून ध्वनिमुद्रित केले जात आहे. देश आणि परदेशातील गायकांकडून मिळालेल्या प्रतीसादानंतर तब्बल ४१२ गायक स्पर्धकांमधून दोघांची निवड हे गाणे गाण्यासाठी करण्यात आली असून त्याचे ध्वनीमुद्रण लवकरच होणार आहे. माजलगावचा सौरभ शिरसाठ आणि कोल्हापूरची स्वरूपा बर्वे यांची निवड या गाण्यासाठी केली गेली आहे.

“कुनीबी कसंबी घालुदे पिंगा, बाशिंगाचा कळतोच इंगा.... कसा न कळला कधी न कळला, माझा बी जमलाय जोडा... माझ्या वेडिंगचा शिनेमा काढा...,” असे बोल असलेले हे गाणे हे कलाकार गाणार आहेत. सलील कुलकर्णी यांनी हे बोल फेसबुकच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात ऑनलाइन टाकले होते. त्यानंतर या गाण्याचे व्हीडीओ अपलोड करायचे आवाहन होतकरू गायकांना केले. त्याला देश आणि परदेशातून म्हणजे अगदी ओमान, बाहरीन, अमेरिका, कॅनडा आदी देशांमधून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमधून आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून सर्व वयोगटातील होतकरू गायकांनी आपले व्हिडीओ अपलोड केले होते. पुरुष गायकांपेक्षा महिला गायकांचा प्रतिसाद अधिक होता. पुणे आणि त्याखालोखाल मुंबईतील गायकांनी या आवाहनाला सर्वाधिक प्रतिसाद दिला.

या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आणि स्वरूपा व सौरभ यांची निवड करत असल्याची घोषणा झाली. हा सिनेमा येत्या १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची तीन गाणी याआधीच प्रकाशित करण्यात आली आहेत तर ध्वनीमुद्रित होणारे हे चौथे गाणे आहे.

या वेगळ्या प्रयोगाला मिळालेल्या उत्तुंग प्रतिसादाबद्दल डॉ सलील कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले आहे. “हे गाणे ऑडीशनच्या माध्यमातून गावून घेण्याचे आमचे ठरल्यावर संदीप खरेनेही ते त्याचप्रकारे लिहिले आहे. गेल्या आठवड्यात फेसबुकच्या माध्यमातून मी आवाहन केल्यानंतर १३ ते १६ मार्च या चार दिवसांमध्ये या आवाहनाला भरभरून प्रतिसाद लाभला. आज आम्ही त्यातील विजेत्यांची घोषणा केली. मला खूप आनंद होतोय की माजलगावचा सौरभ आणि कोल्हापूरची स्वरूपा हे धमाल गाणे गाणार आहेत,”

डॉ सलिल कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली. पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यामध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या सिनेमात शिवाजी साटम, अलका कुबल, मुक्ता बर्वे, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर या आघाडीच्या कलाकारांबरोबरच भाऊ कदम, प्रवीण तरडे, हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आता सिनेमाच्या प्रमोशनसाठी वापरलेला हा फंडा सिनेमाला किती फायदेशीर ठरतो ते कळेलच पण या दोघांनी गायलेलं गाणं सुपरहिट ठरलं तर ते त्यांच्या करियरला कलाटणी देणारी घटना असेल. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.