ETV Bharat / sitara

सिंगापूरमध्ये उघडणार थिएटर्सचे दरवाजे, १५ जुलैला झळकणार 'पेनीन्सुला'

author img

By

Published : Jul 6, 2020, 5:08 PM IST

इन्फोकॉम मीडिया डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या घोषणेनंतर सिंगापूरमधील मोठ्या सिनेमा वितरण कंपन्यांनी जाहीर केले आहे की ते 13 जुलैपासून आपले दरवाजे पुन्हा उघडतील. काही स्वतंत्र थिएटर्सनी मालकांनी सांगितले की ते 15 जुलै रोजी पुन्हा थिएटर्सची दारे उघडतील.

Peninsula among first releases
१५ जुलैला झळकणार 'पेनीन्सुला'

सिंगापूरः कोविड -१९ नंतर सामान्यतेच्या दिशेने पुढील पावले उचलल्यामुळे सिंगापूरमधील सिनेमे या महिन्याच्या शेवटी पुन्हा सुरू होणार आहेत. सिनेमाच्या कामकाजादरम्यान सोशल डिस्टन्सिंग आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या उपायांचे पालन केले जाईल.

व्हरायटीने दिलेल्या माहितीनुसार इन्फोकॉम मीडिया डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या घोषणेनंतर मोठ्या सिनेमांच्या वितरण कंपन्यांनी 13 जुलैपासून त्यांचे दरवाजे पुन्हा सुरू करण्याचे जाहीर केले. काही स्वतंत्र थिएटर्सनी मालकांनी सांगितले की ते 15 जुलै रोजी पुन्हा थिएटर्सची दारे उघडतील.

कोरोनाव्हायरसच्या प्रसारावर आळा बसावा यासाठी 26 मार्चपासून सिनेमागृह बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. 5.5 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या सिंगापूरमध्ये कोव्हिड -19 संक्रमणाची 44,800 प्रकरणे नोंदली गेली आहेत.

प्रत्येक सिनेमा हॉल एका वेळी जास्तीत जास्त 50 प्रेक्षकांसाठी मर्यादित असेल. प्रेक्षकांना खाणे पिणे वगळता सर्व वेळी मास्क घालावे लागतील. मित्र किंवा कुटुंबातील सुमारे पाच लोक 1 मीटर सुरक्षित अंतराच्या आवश्यकतेशिवाय एकत्र बसू शकतात. परंतु इतर सर्व प्रेक्षकांनी 1 मीटर सुरक्षित अंतराच्या आवश्यकतेचे पालन करणे बंधनकारक आहे.

पुन्हा एकदा थिएटर्स उघडल्यानंतर सिनेमे कसे चालविले जावेत याकरिता त्यांची स्वतःची अतिरिक्त मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली आहेत. तापमान तपासणी, सरकारने-जारी केलेल्या SafeEntry अ‍ॅपचा वापर आणि स्वच्छताविषयक उपाययोजनांमध्ये वाढ केली आहे.

सिंगापूरमधील बॉक्स ऑफिसवर सामान्यत: मुख्य प्रवाहातील हॉलिवूड चित्रपटांचे वर्चस्व असते. अलीकडील दिवसांमध्ये, टेनेट आणि मुलान यांच्या रिलीजच्या तारखा निश्चित झाल्या होत्या.

कोरियन चित्रपट ट्रेन टू बुसानचा सीक्वल असलेला पेनीन्सुला हा चित्रपट आता सर्वप्रथम झळकेल. १५ जुलैला हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.