ETV Bharat / sitara

'इट्स टाईम फॉर देसी सेलिब्रेशन'; सिद्धार्थने शेअर केलं 'जबरिया जोडी'चं नवं गाणं - celebration

या चित्रपटातील सिद्धार्थ आणि परिणीतीचं 'खडके ग्लासी' हे गाणे अलिकडेच प्रदर्शित झाले. आता पुन्हा देसी सेलिब्रेशनसाठी तयार राहा, असे म्हणत सिद्धार्थने नवे गाणे शेअर केले आहे.

'इट्स टाईम फॉर देसी सेलिब्रेशन'; सिद्धार्थने शेअर केलं 'जबरिया जोडी'चं नवं गाणं
author img

By

Published : Jul 11, 2019, 8:50 PM IST

मुंबई - अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांची जोडी पुन्हा एकदा 'जबरिया जोडी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील सिद्धार्थ आणि परिणीतीचं 'खडके ग्लासी' हे गाणे अलिकडेच प्रदर्शित झाले. आता पुन्हा देसी सेलिब्रेशनसाठी तयार राहा, असे म्हणत सिद्धार्थने नवे गाणे शेअर केले आहे.

'जीला हिलेला' असे या नव्या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात सिद्धार्थसोबत पिरिणीती नाही, तर अभिनेत्री एली अवराम हिचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळतो. या गाण्याला भोजपूरी शब्दांचा तडका लागल्याने हे गाणे सर्वांना ठेका धरायला लावेल, हे नक्की.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

राजा हसन, देव नेगी, परवेश मलिक आणि मोनाली ठाकुर यांचा आवाजाचा तडका या गाण्याला लागला आहे. तर, तनिष्क बागची याने हे गाणे कंपोज केले आहे. शब्बीर अहमद आणि तनिष्क बागची यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

'जबरिया जोडी' चित्रपटाच्या निमित्ताने परिणीती आणि सिद्धार्थ 'हसीं तो फसी' चित्रपटानंतर पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर, एकता कपूर आणि शैलेश सिंग करत आहेत. २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.