ETV Bharat / sitara

सिद्धार्थ चांदेकरचा चाहत्यांना धक्का, म्हणाला... - social media

सिद्धार्थची अलिकडेच 'सिटी ऑफ ड्रिम्स' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेबसीरिजला चाहत्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला. त्याच्या अभिनयाचे कौतुकही केले.

सिद्धार्थ चांदेकरचा चाहत्यांना धक्का, म्हणाला...
author img

By

Published : May 7, 2019, 9:15 AM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीचा 'हॅन्डसम हंक' सिद्धार्थ चांदेकरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता छोट्या पडद्यावरही त्याने आगमन केले आहे. 'जिवलगा' या मालिकेतून तो घराघरात पोहोचला आहे. मात्र, या सर्वात त्याने चाहत्यांना एक धक्कादायक बातमी दिली आहे.

सिद्धार्थची अलिकडेच 'सिटी ऑफ ड्रिम्स' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. या वेबसीरिजला चाहत्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला. त्याच्या अभिनयाचे कौतुकही केले. मात्र, सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना काही महिन्यांसाठी 'गुड बाय' म्हटले आहे. होय, सिद्धार्थ काही काळापर्यंत सोशल मीडियापासून दुर जात आहे. 'तुम्हा सर्वांपासून मी १८ महिने दुर जात आहे. तोपर्यंत मला मिस करा, गुड बाय', असे कॅप्शन देत त्याने एक फोटो शेअर केला आहे.

Siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट

त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी सिद्धार्थ नेमका कुठे आणि कशासाठी दूर जात आहे, याबद्दलच्या प्रतिक्रिया त्याच्या पोस्टवर दिल्या. सिद्धार्थने या फोटोत हॅशटॅग लंडन टाईम्स असे लिहिले आहे. त्यावरुन तो लंडनला जाणार असल्याचे समजते. मात्र, लंडनला तो कशासाठी जात आहे, हे त्याने सांगितले नाही.

चाहत्यांनी त्याच्या या फोटोवर कमेंट करून 'आम्ही तुला मिस करू', असे लिहिले आहे. तसेच, त्याच्या नव्या कामासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Intro:Body:

ENT 03

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.