मुंबई - आयुष्मान खुरानाचा यावर्षीचा पहिला चित्रपट 'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमागृहात दाखल झाला आहे. नेहमीच आपल्या हटके चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या आयुष्मानने 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातूनही आपली दमदार छाप उमटवण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ झाली आहे.
आयुष्मान खुराना म्हणजे हिट चित्रपट हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक प्रदर्शित झालेल्या त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार व्यवसाय केला आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांचा हिरो म्हणून आयुष्मानची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
-
#ShubhMangalZyadaSaavdhan jumps on Day 2... Metros witness growth, while mass pockets remain strictly average... The trend suggests further growth on Day 3... Eyes ₹ 34 cr [+/-] weekend, which is a healthy score... Fri 9.55 cr, Sat 11.08 cr. Total: ₹ 20.63 cr. #India biz. #SMZS
— taran adarsh (@taran_adarsh) February 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#ShubhMangalZyadaSaavdhan jumps on Day 2... Metros witness growth, while mass pockets remain strictly average... The trend suggests further growth on Day 3... Eyes ₹ 34 cr [+/-] weekend, which is a healthy score... Fri 9.55 cr, Sat 11.08 cr. Total: ₹ 20.63 cr. #India biz. #SMZS
— taran adarsh (@taran_adarsh) February 23, 2020#ShubhMangalZyadaSaavdhan jumps on Day 2... Metros witness growth, while mass pockets remain strictly average... The trend suggests further growth on Day 3... Eyes ₹ 34 cr [+/-] weekend, which is a healthy score... Fri 9.55 cr, Sat 11.08 cr. Total: ₹ 20.63 cr. #India biz. #SMZS
— taran adarsh (@taran_adarsh) February 23, 2020
हेही वाचा -बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'शुभ मंगल ज्यादा सावधान' vs 'भूत', कोण मारली बाजी?
'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाद्वारेही आयुष्मान आगळी वेगळी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच 'गे'च्या भूमिकेत दिसला आहे. आपल्या या भूमिकेद्वारे प्रेक्षकांवर छाप पाडण्यात तो यशस्वी ठरला आहे.
समलैंगिक व्यक्तीच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आहे. आपले प्रेम मिळवण्यासाठी कुटुंबासोबतच त्याला कशाप्रकारे लढा द्यावा लागतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. आयुष्मानसोबतच जितेंद्र कुमारने साकारलेल्या भूमिकेचीही प्रशंसा केली जात आहे.
दोघांच्याही अभिनयाला चित्रपट समीक्षकांसह प्रेक्षकांची दाद मिळत आहे. पहिल्या दिवशी ९.५५ कोटींची कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपट डबल डिजीट आकड्यांमध्ये व्यवसाय करत ११.०८ कोटीची कमाई केली आहे. या आकड्यांमध्ये रविवारी देखील भर पडण्याची शक्यता असल्याचा समीक्षकांनी अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा -आयुष्यमान आणि विकी कौशलने आपल्या सिनेमांच्या रिलीजपूर्वी केला 'ब्रोमान्स'
विशेष म्हणजे विकी कौशलचा 'भूत' हा चित्रपट देखील या चित्रपटाच्या शर्यतीत उतरला आहे. या चित्रपटाला मागे टाकत आयुष्मानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारत आहे.