मुंबई - स्नेहा तौरानी यांच्या आगामी 'भंगड़ा पा ले' या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री श्रीया पिळगांवकर झळकणार आहे. यात ती विशेष कलाकार म्हणून काम करीत असली तिची यात महत्त्वाची भूमिका असेल.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट १९४० च्या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका कथेवर आधारित आहे.
याबद्दल बोलताना श्रेय म्हणाली, ''स्नेहाच्या 'भंगड़ा पा ले' या चित्रपटाचा एक भाग बनल्यामुळे खूप उत्साही आहे. त्यांच्यासोबत काम करताना मजा येते.''
'भंगड़ा पा ले' या चित्रपटात सनी कौशल आमि रुख्सार ढिल्लों यासारखे कलाकार आहेत.
ती पढे म्हणाली, ''माझा सनीसोबत खूप सुंदर रोल आहे. मी पंजाबमध्ये पहिल्यांदा शूट केले आहे आणि मला ते खूप चांगले वाटले. या चित्रपटात काम करणे खूप उत्साहजनक आहे.''
'मिर्जापुर' मध्ये चांगले काम केल्यानंतर श्रीयाच्या हात खूप चांगले चित्रपट आहेत. यात गुरिंदर चड्ढा यांचा 'बेचम हाऊस', इरॉस इंटरनेशनलचा 'हाथी मेरे साथी', आणि अनुभव सिन्हा यांच्या 'अभी तो पार्टी शुरू हुई है' या चित्रपटांचा समावेश आहे.