मुंबई - अभिनेत्री श्रद्धा कपूर अलीकडेच 'स्ट्रीट डान्सर थ्री डी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाशिवाय ती 'बागी ३' या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या टीमसोबतचा एक फोटोही तिने शेअर केला आहे.
'बागी ३' चित्रपटातील शूटिंगचा अनुभव हा अतिशय खास होता. अतुल्य असा वेळ मी या टीमसोबत घालवला', असे कॅप्शन श्रद्धाने या फोटोवर दिले आहे.
या फोटोमध्ये श्रद्धा तिच्या संपूर्ण टीमसोबत केक कापताना दिसते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -विकी कौशलच्या 'भूत' चित्रपटाचा हॉरर टीझर, पाहा व्हिडिओ
'बागी ३' चित्रपटात टायगर श्रॉफ आणि रितेश देशमुख हे मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे जॅकी श्रॉफ हेही यामध्ये भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे टायगर आणि जॅकी यांनी रिल लाईफमध्येही बापलेकाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.
'बागी' आणि 'बागी २' चित्रपटाप्रमाणे हा देखील एक अॅक्शन चित्रपट असणार आहे. श्रद्धाने 'बागी'मध्येही टायगरसोबत भूमिका साकारली होती. तर, दुसऱ्या भागात दिशा पाटणी ही मुख्य भूमिकेत होती.
हेही वाचा -कंगनाच्या हेअरस्टायलिस्टचा बॉलिवूडमध्ये ५० वर्षांचा प्रवास, 'या' अभिनेत्रींसोबतही केले काम
अहमद खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ६ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.