मुंबई - बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेला शिव ठाकरे हा सध्या त्याच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातच त्याचे विणा जगतापवर प्रेम जडले होते. या कार्यक्रमातूनच त्यांचे प्रेम जगजाहीर झाले. कार्यक्रम संपल्यानंतर दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सुरू झाल्या. तर, शिव आणि विणा दोघेही आपलं प्रेम नेहमीच व्यक्त करताना दिसत असतात.
अलिकडेच विणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. शिवसोबत तिने पहिला टीकटॉक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांचाही रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळतो. या व्हिडिओमध्ये शिव विणाकडे आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">