मुंबई - बॉलिवूडची फिटेस्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी शिल्पा शेट्टी ही योगद्वारे आपल्या चाहत्यांना नेहमी फिट कसे राहावे, याचे धडे देत असते. ती स्वत:देखील योगाचे कडेकोट पालन करते. आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने तिने सुरत येथे योग सेशन घेतले. यामध्ये तब्बल ३००० नागरिकांचा सहभाग होता.
शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर या सेशनचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'योगा करण्यासाठी योग दिनाची का वाट पाहावी, जेव्हा प्रत्येक दिवस हा योग दिन होऊ शकतो', असे तिने या व्हिडिओवर कॅप्शन दिले आहे.
यावेळी तिने योगाच्या काही स्टेप्सही शिकवल्या. योगाचे फायदेही तिने सांगितले. योग केल्यामुळे आपण कसे फिट आणि निरोगी राहू शकतो, याचेही धडे तिने यावेळी दिले.