मुंबई - टीव्ही मालिकांमुळे प्रसिध्दीच्या शिखरावर पोहोचलेला आणि मराठी सिनेमाचा नवा चेहरा बनलेल्या शशांक केतकरचे एक पुण्यात 'आईच्या गावात' हे रेस्टॉरंट आहे. नव्या पेठेतील हे छोटेखानी हॉटेल कोथरुडकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय होता. मात्र आता हे हॉटेल बंद होणार आहे.
शशांक केतकरनेची ही माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. तो लिहितो, "शाळा-कॉलेजमध्ये असताना एक स्वप्न पाहिलं होतं की आपलं स्वतःचं हॉटेल असलं पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण ही झालं! पुण्यात 'आईच्या गावात' या नावाने हॉटेल सुरूही केलं आणि गेली तीन साडेतीन वर्ष आई-बाबा, दीक्षा, प्रियांका आणि हॉटेलचा सगळा स्टाफ यांच्या सपोर्ट नी ते उत्तम चालू ही ठेवलं. पण काही वैयक्तिक कारणांमुळे आता आम्हाला हा व्यवसाय बंद करावा लागतोय.
आत्ताच्या जागेवर संपूर्ण सेटप सहित जर कोणाला हॉटेल चालवायचे असल्यास मला संपर्क साधावा किंवा हॉटेल चे सामान विकत घ्यायचे असल्यासही मला संपर्क साधावा."
शशांकने असे जरी लिहिले असले तरी हे हॉटेल बंद होऊ नये असे त्याच्या चाहकत्यांना वाटते. त्यानी यासाठी कॉमेंट्स करायला सुरूवात केली आहे.