ETV Bharat / sitara

'शहिद भाई कोतवाल' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, २४ जानेवारीला होणार प्रदर्शित - aashutosh patki

या चित्रपटात आशुतोष पत्कीने भाई कोतवाल यांची भूमिका साकारली आहे. तर व परेश हिंदुराव यांनी हिराजी पाटील यांच्या प्रमुख व्यक्तीरेखा साकारल्या आहेत.

Shahid Bhai Kotwal marathi film set to release
'शहिद भाई कोतवाल' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, २४ जानेवारीला होणार प्रदर्शित
author img

By

Published : Jan 19, 2020, 6:15 PM IST

ठाणे - भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेले ठाणे जिल्ह्यातील वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्यावर आधारित 'शहिद भाई कोतवाल' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

'एक तर स्वातंत्र्य.. एक तर स्वर्ग', हे घोषवाक्य उरात बाळगून भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. . स्वातंत्र्याचा हा रक्तरंजित ऐतिहासिक वारसा आणि ही शौर्य कथा प्रथमच चित्रपटाद्वारे प्रदर्शित होत आहे. आतापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती झाली, मात्र आतापर्यंत असा प्रयत्न झाला नव्हता. त्यामुळे या चित्रपटाविषयी तरुण वर्गाला उत्कंठा लागून राहिली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -हरिवंशराय बच्चन यांची इच्छा पूर्ण करत बिग बींनी लिहिली भावनिक पोस्ट

स्वरजाई आर्ट मीडिया प्रोडक्शनचे प्रविण दत्तात्रय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर एकनाथ देसले व पराग सावंत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटात आशुतोष पत्की यांनी भाई कोतवाल यांची भूमिका साकारली आहे. तर व परेश हिंदुराव यांनी हिराजी पाटील यांच्या प्रमुख व्यक्तीरेखा साकारल्या आहेत.

Shahid Bhai Kotwal marathi film set to release
'शहिद भाई कोतवाल' चित्रपट प्र

हेही वाचा -'लव्ह आज कल': कोण आहे कार्तिकसोबत दिसलेली आरुषी शर्मा?

परेश हा नवोदित कलाकार मुरबाडचा आहे. मात्र त्याच्या दमदार अभिनयाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. अशोक पत्की, रूपेश गोंधळी, भरत बडेकर यांनी संगीत दिलेल्या गाण्यांना सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, अशा दिग्गजांचा आवाज लाभला आहे.

चित्रपटात भाई कोतवाल यांच्यासह गोमाजी पाटील आणि हिराजी गोमाजी पाटील, या पिता - पुत्रांच्या शौर्याचा थरार प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Intro:kit 319Body:हुतात्मा भाई कोतवाल चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

ठाणे :- भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेले ठाणे जिल्हातील वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या आझाद दास्तातील क्रांतीविरांच्या व्यक्तिमत्वावर आधारित चित्रपट येत्या 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

एक तर स्वातंत्र्य.. एक तर स्वर्ग हे घोषवाक्य उरात बाळगून भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. स्वातंत्र्याचा हा रक्तरंजित ऐतिहासिक वारसा आणि ही शौर्य कथा प्रथमच चित्रपटाद्वारे प्रदर्शित होत आहे. आतापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती झाली, मात्र आतापर्यंत असा प्रयत्न झाला नव्हता. त्यामुळे या चित्रपटाविषयी तरुण वर्गाला उत्कंठा लागून राहिली आहे. स्वरजाई आर्ट मीडिया प्रोडक्शनचे प्रविण दत्तात्रय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.तर एकनाथ देसले व पराग सावंत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटात आशुतोष पत्की यांनी भाई कोतवाल यांची तर व परेश हिंदुराव यांनी हिराजी पाटील यांच्या प्रमुख व्यक्तीरेखा साकारल्या आहेत.परेश हा नवोदित कलाकार मुरबाडचा असुन त्याचा अभिनय एखाद्या कसलेल्या कलाकारागत वाटत आहे. प्रदर्शित ट्रेलर मध्ये त्याचा अभिनय वाख्यान जोगा आहे. अशोक पत्की, रूपेश गोंधळी , भरत बडेकर यांनी संगीत दिलेल्या गाण्यांना सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, अशा दिग्गजांचा आवाज लाभला आहे. चित्रपटात भाई कोतवाल यांच्यासह गोमाजी पाटील आणि हिराजी गोमाजी पाटील, या पिता - पुत्रांच्या शौर्याचा थरार प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Conclusion:bhai kotval
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.