मुंबई - हॉलिवूडचा आगामी 'द लॉयन किंग' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी किंग खान शाहरुख आणि त्याचा मुलगा आर्यन आपला आवाज देणार आहे. या चित्रपटात जंगलचा राजा 'मुफासा'चा आवाज शाहरुख देणार आहे. तर, 'सिंबा'च्या पात्राला किंग खानचा मुलगा आर्यनचा आवाज मिळणार आहे.
डिस्नेसोबत शाहरुखने हातमिळवणी केली आहे. 'फादर्स डे' च्या निमित्ताने शाहरुखने आर्यनसोबतचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये शाहरुख आणि आर्यनच्या टीशर्टवर 'मुफासा' आणि 'सिंबा' यांच्या नावाचा उल्लेख होता. आता या दोन्हीही पात्रासाठी ते आवाज देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
![Shah Rukh Khan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3579480_srk.jpg)
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबबतची अधिकृत माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. चाहत्यांनाही आता या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची उत्सुकता आहे. हा चित्रपट १९ जुलै २०१९ रोजी प्रदर्शित होईल.