मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून देशभरातील विविध शहरांमध्ये आंदोलन सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी नागरिकता संशोधन कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (NRC) विरोधात होणाऱ्या आंदोलनाला आपले समर्थन दिले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले आहे.
आपल्या व्हिडिओद्वारे त्यांनी सरकारला आपले म्हणणे शांततेने ऐकून घेण्याची विनंती केली आहे. 'मी यावेळी हिंदुस्थानात नाही. मात्र, CAA आणि NRC च्या विरोधात जी आंदोलनं होत आहेत, माझं त्यांना समर्थन आहे. त्यांच्या आंदोलनात मी सहभागी होऊ शकली नाही, त्याची खंत आहे. मात्र, मी नेहमीच तुमच्यासोबत आहे,' असे शबाना यांनी ट्विट करून म्हटले आहे. मात्र, हे आंदोलन कोणत्याही हिंसेशिवाय सुरू ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे'.
-
In solidarity with protestors against CAA and NRC pic.twitter.com/hynuypyNsm
— Azmi Shabana (@AzmiShabana) December 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">In solidarity with protestors against CAA and NRC pic.twitter.com/hynuypyNsm
— Azmi Shabana (@AzmiShabana) December 19, 2019In solidarity with protestors against CAA and NRC pic.twitter.com/hynuypyNsm
— Azmi Shabana (@AzmiShabana) December 19, 2019
हेही वाचा -आलियाने शेअर केला राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा फोटो, म्हणते 'विद्यार्थ्यांकडून शिका'
त्यांनी त्यांची आई कैफी आझमी यांचा शायरीतील काही ओळींचा या व्हिडिओत उल्लेख केला आहे.
'आज की रात बहुत गर्म हवा चलती है,
आज की रात न फुटपाथ पे नींद आएगी,
सब उठो, मैं भी उठूं, तुम भी उठो, तुम भी उठो,
कोई खिड़की इसी दीवार में खुल जाएगी.'
शबाना आझमी यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा -"खरी 'तुकडे तुकडे गँग' तुमचा आयटी सेल आहे", रेणूकाचे मोंदींना 'थेट' उत्तर