ETV Bharat / sitara

'सावधान, पुढे गाव आहे' सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित

‘सावधान, पुढे गाव आहे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मुन्नावर शमीम भगत यांनी केले असून त्याची निर्मिती मीना शमीम फिल्म्सची आहे

'सावधान, पुढे गाव आहे' सिनेमा
author img

By

Published : Mar 16, 2019, 3:08 PM IST

Updated : Mar 16, 2019, 4:18 PM IST

मुंबई - आपला देश आजही बहुतांशी गावांमध्ये वसतो. भली मोठी शहरे विकसित झाली असली तरी त्यांची पोटे गावांमुळेच भरली जातात, कारण आपल्या कृषिप्रधान देशातील ३ चथुर्तांश जनता शेती करते. शहरांमध्ये आयुष्य व्यतीत करणारे बरेचजण संधी मिळताच आपल्या मनः शांती मिळवण्यासाठी गावाकडे जातात. खरंतर काँक्रीट जंगलामध्ये राहिल्यावर गावाकडच्या हिरवळीची ओढ अजूनच वाढते. त्यातच जे परदेशात स्थायिक झालेत त्यांना तर आपला देश, आपलं गाव नेहमीच खुणावत असतं.

अशाच एका गावाची गोष्ट ‘सावधान, पुढे गाव आहे’ या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. हा चित्रपट एक सामाजिक संदेशही देऊ पाहतो. प्रवास करताना शक्यतो प्रत्येकालाच ‘सावधान, पुढे गाव आहे’ अशी पाटी दिसलीच असेल. पुढे गाव आहे की गाव पुढे आहे या शक्यतांचा विचार दिग्दर्शकाने या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतंच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाच्या पोस्टरवर ‘सावधान, पुढे गाव आहे’ या पाटीवर गिधाड बसलेले दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या विषयात गूढताही असण्याची शक्यता आहे.

‘सावधान, पुढे गाव आहे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मुन्नावर शमीम भगत यांनी केले असून त्याची निर्मिती मीना शमीम फिल्म्सची आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

Intro:
आपला देश आजही बहुतांशी गावांमध्ये वसतो. भली मोठी शहरे विकसित झाली असली तरी त्यांची पोटे गावांमुळेच भरली जातात, कारण आपल्या कृषिप्रधान देशातील तीन चथुर्तांश जनता शेती करते. शहरांमध्ये आयुष्य व्यतीत करणारे बरेचजण संधी मिळताच आपल्या मनःशांती मिळवण्यासाठी जातात. खरंतर काँक्रीट जंगलामध्ये राहिल्यावर गावाकडच्या हिरवळीची ओढ अजूनच वाढते. त्यातच जे परदेशात स्थायिक झालेत त्यांना तर आपला देश, आपलं गाव नेहमीच खुणावत असत. गावात जन्मलेली लोकं आपल्या मुलांना सांगत ते आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात.

अशाच एका गावाची गोष्ट ‘सावधान, पुढे गाव आहे’ या चित्रपटातून सांगण्यात आली आहे.
हा चित्रपट एक सामाजिक संदेशही देऊ पाहतो. प्रवास करताना शक्यतो प्रत्येकालाच ‘सावधान, पुढे गाव आहे’ अशी पाटी दिसलीच असेल. पुढे गाव आहे की गाव पुढे आहे या शक्यतांचा विचार दिग्दर्शकाने या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
नुकतच या चित्रपटाचे पोस्टर समाज माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाच्या पोस्टरवर ‘सावधान, पुढे गाव आहे’ या पाटीवर गिधाड बसलेले दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या विषयात गूढताही असण्याची शक्यता आहे.

‘सावधान, पुढे गाव आहे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मुन्नावर शमीम भगत यांनी केले असून त्याची प्रस्तुती मीना शमीम फिल्म्सची आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून योग्य वेळ आल्यावर ती जाहीर करण्यात येणार आहेत. तूर्तास तुम्ही हे पोस्टर पाहून सिनेमातील गूढ नक्की काय असेल ते शोधून पहा. Body:.Conclusion:.
Last Updated : Mar 16, 2019, 4:18 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.