ETV Bharat / sitara

विद्या बालनच्या 'शकुंतला देवी' बायोपिकमध्ये 'दंगल गर्ल' साकारणार 'ही' भूमिका - Shakuntala Devi

शकुंतला देवींनी आपली बुद्धीमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून संपूर्ण जगाला चक्रावून सोडले. या चित्रपटात सान्याचीही महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे.

विद्या बालनच्या 'शकुंतला देवी' बायोपिकमध्ये 'दंगल गर्ल' साकारणार 'ही' भूमिका
author img

By

Published : Oct 4, 2019, 12:03 PM IST

मुंबई - मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवी यांच्या जीवनावर बायोपिक येणार आहे. अभिनेत्री विद्या बालन यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विद्याने या चित्रपटाचे मोशन पोस्टरही शेअर केले होते. यामध्ये 'दंगल' फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा देखील भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक शेअर करण्यात आला आहे.

सान्या मल्होत्रा या चित्रपटात अनुपमा बॅनर्जी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी तिचा एक फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. सान्यानेही सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर केला आहे.

  • Sanya Malhotra as Anupama Banerji in #ShakuntalaDevi... Based on the life of the mathematical genius, the ‘human computer’ - Shakuntala Devi... Stars Vidya Balan in title role... Directed by Anu Menon... Summer 2020 release. pic.twitter.com/fnpE7KaFqW

    — taran adarsh (@taran_adarsh) October 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'शकुंतला देवी' बायोपिकच्या शूटिंगला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. अनु मेनन हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -शाहरुखच्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच करणार चित्रपटाची घोषणा

कोण आहेत शकुंतला देवी -
शकुंतला देवींनी आपली बुद्धीमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून संपूर्ण जगाला चक्रावून सोडले. १८ जून १९८० मध्ये त्यांना दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले होते. त्यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ २८ सेकंदांमध्ये हे उत्तर दिलं. यामुळेच ह्युमन कॉम्प्युटर, अशी त्यांची ओळख निर्माण झाली.

हेही वाचा -'मिस्टर इंडिया'मध्ये 'या' अभिनेत्याने साकारली होती बालकलाकाराची भूमिका

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.