ETV Bharat / sitara

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर चित्रपट साकारणार संजय लीला भन्साळी - prabhas news

'मन बैरागी' असे या आगामी चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट आपल्यासाठी खूप खास असल्याचं संजय लीला भन्साळी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर चित्रपट साकारणार संजय लीला भन्साळी, हा अभिनेता मुख्य भूमिकेत
author img

By

Published : Sep 17, 2019, 10:06 AM IST

Updated : Sep 17, 2019, 11:24 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम मोदी' हा बायोपिक काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेता विवेक ओबेरॉयने या चित्रपटात मोदींची भूमिका साकारली होती. मात्र, आता बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे देखील त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्याच्या बेतात आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरचं बाहुबली स्टार प्रभास हा अनावरण करणार आहे.

sanjay leela bhanshali and prabhas announced film on pm modi on his birthday
पंतप्रधान मोदींच्या जीवनावर चित्रपट साकारणार संजय लीला भन्साळी

'मन बैरागी' असे या आगामी चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट आपल्यासाठी खूप खास असल्याचं संजय लीला भन्साळी यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ एकाच तासाचा असणार आहे.

हेही वाचा -अभिषेक बच्चनने सुरू केलं आगामी चित्रपटाचं शूटिंग, शिर्षक गुलदस्त्यात

हा चित्रपट बनवण्याचा उद्देश म्हणजे, मोदींचे आयुष्य हे सार्वभौमिक अपिल आणि एक विशेष संदेश देणारे आहे. त्यामुळे हा चित्रपट तयार करणार असल्याचं भन्साळींनी सांगितलं. प्रभास देखील त्यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर लाँच करणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातारण आहे. दोनवेळा निवडणुका जिंकून मोदींनी आपलं सरकार स्थापन केलं आहे. बॉलिवूडमधुनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा-...म्हणून आयफा पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करणं सारा अली खानसाठी असणार खास

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 17, 2019, 11:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.