ETV Bharat / sitara

बहिणीची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या भावाची गोष्ट, पाहा 'खारी- बिस्कीट'चा ट्रेलर - khari biscuit film

'खारी बिस्कीट' चित्रपटातून एक मायचा ओलावा असलेले भावा-बहिणीचे नाते प्रेक्षकांना अनुभवता येईल.

पाहा 'खारी- बिस्कीट'चा ट्रेलर
author img

By

Published : Oct 10, 2019, 11:39 AM IST

मुंबई - आजवर मराठी सिनेसृष्टीत बहिण - भावाच्या नात्यावर बरेच चित्रपट तयार झाले आहेत. अशाच बहिण-भावाच्या भावनिक नात्यावर आधारित असलेला 'खारी - बिस्किट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांचा हा ५० वा चित्रपट आहे. या चित्रपटात खारी नावाच्या बहिणीसाठी 'बिस्किट' असलेला भाऊ तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी काय काय करतो, हे दाखवण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. तसंच या चित्रपटातील गाणंदेखील सोशल मीडियावर हिट ठरलं आहे. वेदश्री खाडिलकर आणि आदर्श कदम यांनी या चित्रपटात 'खारी' आणि 'बिस्किट' हे पात्र साकारलं आहे.

हेही वाचा -'मुखवट्यामागे चेहरा लपतो, रावण नाही', 'विकी वेलींगकर'च्या 'मास्क मॅन'ची उत्कंठा कायम

खारी ही अंध असल्यामुळे तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी बिस्किट कशाप्रकारे मेहनत घेतो, हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. तिच्या आनंदासाठी काहीही करण्यासाठी तयार असलेला तिचा भाऊ तिची वर्ल्ड कप पाहण्याची इच्छा कशी पूर्ण करेल, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. मात्र, ट्रेलरमध्ये दोघांचीही गोंडस आणि निरागस झलक पाहायला मिळते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'खारी बिस्कीट' चित्रपटातून एक मायचा ओलावा असलेले भावा-बहिणीचे नाते प्रेक्षकांना अनुभवता येईल.

हेही वाचा -ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तब्बल ४ वर्षांनी 'डॅडी' दगडी चाळीत परतले

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.