ETV Bharat / sitara

भावनेला भाषा नसते, संजय दत्तच्या 'बाबा' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

संपूर्ण कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या बापाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. कामाच्या जाळ्यात अडकलेल्या वडिलांचं प्रेम ओठांवर नसलं तरी, मनात कायम कुटुंबाची चिंता असते. अशाच आशयाचा 'बाबा' हा चित्रपट असणार आहे.

author img

By

Published : Jul 8, 2019, 8:42 PM IST

भावनेला भाषा नसते, संजय दत्तच्या 'बाबा' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त मराठी सिनेसृष्टीत निर्मितीक्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याच्या निर्मितीखाली तयार होत असलेला 'बाबा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे.

संपूर्ण कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या बापाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. कामाच्या जाळ्यात अडकलेल्या वडिलांचं प्रेम ओठांवर नसलं तरी, मनात कायम कुटुंबाची चिंता असते. अशाच आशयाचा 'बाबा' हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. 'भावनेला भाषा नसते' अशी दमदार टॅगलाईन या चित्रपटाच्या पोस्टरवर देण्यात आली आहे.

Sanjay Dutt ventures into Marathi film production First look poster of Baba
बाबा चित्रपटाचे पोस्टर

'बाबा' चित्रपटाच्या टीजरमध्ये एका वडील आणि मुलाच्या नात्याची असलेली सुंदर कथा पाहायला मिळते. संजय दत्तने त्याच्या वडिलांना हा चित्रपट समर्पित केला आहे. त्यामुळे या चित्रपटात वडील आणि मुलाचे भावनिक नाते पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हा बॉलिवूड कलाकार झळकणार
'तनु वेडस मनू' फेम अभिनेता दीपक डोब्रीयाल चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तो ओमकारा, तनू वेड्स मनू, दबंग 2, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, हिंदी मीडियम यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकला आहे. तनू वेड्स मनू रिटर्न्स या चित्रपटातील त्याचे संवाद चांगलेच गाजले होते.

त्यांच्याबरोबर नंदिता पाटकर स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे.

Intro:Body:

entertainment

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.