मुंबई - सलमान खानचा 'राधे: योर मोस्ट वांटेड भाई' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटातील गाणे सद्या तरुणाईमध्ये धूम करीत आहेत. या चित्रपटातील पहिलं गाणं, 'सीटी मार' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर जॅकलिन फर्नाडिसचं गाणं 'दिल दे दिया'ने तर सोशल मीडियावर धम्माल उडवून दिली. आता या चित्रपटातील आणखी एक गाणं उद्या रिलीज होणार आहे.
राधे चित्रपटातील 'झूम झूम' हे गाणं उद्या रिलीज होणार आहे. या गाण्याचा टिझर आज रिलीज करण्यात आलं आहे. यात सलमान आणि दिशाची केमेट्री पाहायला मिळत आहे. हे गाणं सीजर गोंसाल्वस यांनी कोरियोग्राण केलं आहे. तर अॅश किंग आणि यूलिया वंतूर यांनी हे गाण गायलं आहे. झूम झूम हे गाणं कुणाल वर्मा यांनी लिहलं आहे. तर याला संगीत साजिद-वाजिद यांनी दिलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
राधे चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्राफ प्रमुख भूमिकेत आहेत. राधे: योर मोस्ट वांटेड भाई हा चित्रपट सलमान खान फिल्म्सने झी स्टुडिओसोबत मिळून तयार केला आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजे १३ मे रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट झी-५ वर पाहता येणार आहे. झी प्लेक्स डीटीएच प्लॅटफार्म डिश, डी२एच, टाटा स्काय आणि एयरटेल डिजिटल टिव्हीवर उपलब्ध आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - शाहरुख खानचा 'बॉडी डबल' प्रशांत वालदे अभिनित 'प्रेमातूर'चे प्रदर्शन गेले पुढे!
हेही वाचा - मातृदिनाच्या निमित्ताने करीनाने शेअर केला छोट्या नवाबाचा फोटो, म्हणाली...