ETV Bharat / sitara

'दबंग ३'चं शूटिंग पूर्ण; सलमानने व्हिडिओ शेअर करत विनोद खन्नांना वाहिली आदरांजली - salman khan news

सलमान खान आणि विनोद खन्ना यांनी 'दबंग', 'दबंग २' आणि वॉन्टेड यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारली होती. 'दबंग' चित्रपटात विनोद खन्ना हे सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले होते.

'दबंग ३'चं शूटिंग पूर्ण, सलमान खानने व्हिडिओ शेअर करुन विनोद खन्नांना वाहिली आदरांजली
author img

By

Published : Oct 7, 2019, 8:24 AM IST

मुंबई - सलमान खानच्या बहुचर्चित 'दबंग ३' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. 'चुलबुल पांडे'च्या रुपात सलमान खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे आत्तापर्यंत बरेचसे अपडेट्स सलमानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शूटिंग पूर्ण झाल्यानंतरही त्याने संपूर्ण टीमसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांच्या बर्थ अनिव्हर्सरीच्या दिवशीच शूटिंग पूर्ण झाल्याने सलमानने या व्हिडिओतून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

सलमान खान आणि विनोद खन्ना यांनी 'दबंग', 'दबंग २' आणि वॉन्टेड यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारली होती. 'दबंग' चित्रपटात विनोद खन्ना हे सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले होते. आता 'दबंग ३' चित्रपटात विनोद यांचे भाऊ प्रमोद खन्ना हे त्यांच्या जागेवर दिसणार आहेत.

हेही वाचा -काजोल आणि राणी मुखर्जीने एकत्र साजरी केली दुर्गाष्टमी

'दबंग ३'चे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केलं आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, अरबाज खान यांचीही मुख्य भूमिका आहे.
२० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -'सुपर ३०', 'बाटला हाऊस'नंतर अभिनेत्री मृणाल ठाकूरची करण जोहरच्या वेबसीरिजमध्ये वर्णी

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.