मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि 'ईद'चा मुहूर्त हे वर्षानुवर्षापासून जुळत आलेलं एक समीकरणंच आहे. दरवर्षी 'ईद'च्या मुहूर्तावर त्याचे चित्रपट प्रदर्शित होत असतात. 'ईद'च्या दिवशीचा मुहूर्त हा सलमानच्या चित्रपटांसाठी ठरलेला असतो म्हणून शक्यतो इतर अभिनेत्यांचे चित्रपट या दिवशी प्रदर्शित होत नाहीत. मात्र, पुढच्या वर्षीची 'ईद' ही भाईजानच्या चित्रपटाशिवायच साजरी होणार असल्याचे दिसतेय. याचा खुलासा खुद्द सलमान खाननेच केला आहे.
सलमान खान आणि आलिया भट्ट यांची जोडी असलेला 'ईन्शाल्ला' हा चित्रपट पुढच्या वर्षी 'ईद'च्या दिवशी प्रदर्शित होणार होता. दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्यासोबत सलमान खान पुन्हा या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहे. त्यामुळे हा चित्रपट त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मात्र, आता हा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचे सलमान खानने सांगितले आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी देखील ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.
-
Salman Khan makes big announcements...
— taran adarsh (@taran_adarsh) August 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
⭐ #Inshallah - the film that reunites Salman and Sanjay Leela Bhansali - *won't* arrive on #Eid2020.
⭐ Salman will retain #Eid2020 release week. Will bring another film instead.
">Salman Khan makes big announcements...
— taran adarsh (@taran_adarsh) August 25, 2019
⭐ #Inshallah - the film that reunites Salman and Sanjay Leela Bhansali - *won't* arrive on #Eid2020.
⭐ Salman will retain #Eid2020 release week. Will bring another film instead.Salman Khan makes big announcements...
— taran adarsh (@taran_adarsh) August 25, 2019
⭐ #Inshallah - the film that reunites Salman and Sanjay Leela Bhansali - *won't* arrive on #Eid2020.
⭐ Salman will retain #Eid2020 release week. Will bring another film instead.
सलमान खानचे आत्तापर्यंत ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. मात्र, त्याने अचानक हा निर्णय का घेतला, याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. आता 'ईन्शाल्ला' चित्रपटासाठी दुसरा कोणता मुहूर्त ठरवण्यात येतो, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.