ETV Bharat / sitara

सलमान खानने केक कापून जागवली वाजिद खानच्या जन्मदिनाची स्मृती - वाजिद खानचे निधन झाले

दिवंगत संगीतकार वाजिद खान यांच्या जन्मदिनाची स्मृती केक कापून जागवली. वाजिद खानचा वाढदिवस 7 ऑक्टोबर रोजी होता. वाजिद अली खानचा भाऊ साजिद अली खानने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि तो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये सलमान केक कापत असल्याचे दिसत आहे. साजिद आणि युलिया त्याच्या शेजारी उभे आहेत.

वाजिद खानच्या जन्मदिनाची स्मृती
वाजिद खानच्या जन्मदिनाची स्मृती
author img

By

Published : Oct 9, 2021, 7:04 PM IST

मुंबई - सलमान खानने दिवंगत संगीतकार वाजिद खान यांच्या जन्मदिनाची स्मृती केक कापून जागवली. वाजिद खानचा वाढदिवस 7 ऑक्टोबर रोजी होता. संगीतकार साजिद-वाजिद हे सलमान खानच्या खूप जवळचे आहेत. या निमित्ताने सलमानने पुन्हा वाजिदची आठवण काढली. याप्रसंगी युलिया वंतूर आणि सलमानचा भाऊ सुहेल खान देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे 1 जून 2020 रोजी वाजिद खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. कोरोनाच्या काळात ते आजारी होते.

वाजिद अली खानचा भाऊ साजिद अली खानने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला आणि तो इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना साजिद खानने लिहिले, 'कोणाला सांगावे, कसे सांगावे की आम्हाला तू किती आवडत होतास. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो वाजिद. संपूर्ण जगाला तू हवा होतास. व्हिडिओमध्ये सलमान केक कापत असल्याचे दिसत आहे. साजिद आणि युलिया त्याच्या शेजारी उभे आहेत.

सलमानने दिले होते काम

सलमान खानने साजिद-वाजिदला संगीतकार म्हणून बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. या जोडीने 1998 मध्ये आलेल्या 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटाला संगीत दिले, जे सुपर-डुपर हिट झाले होते.

या चित्रपटाची सर्व गाणी ब्लॉकबस्टर ठरली. यानंतर साजिद-वाजिदने कधीही मागे वळून पाहिले नाही. साजिद-वाजिद जोडीने 'पार्टनर', 'दबंग' आणि 'वॉन्टेड' सारख्या सुपरहिट चित्रपटांसह सलमानच्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.

वर्कफ्रंटवर सलमान खान

आजकाल सलमान खान 'टायगर -3' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमानने 'टायगर 3' चे रशिया आणि तुर्कीमध्ये अलिकडेच शूटिंग पूर्ण केले आहे. कॅटरिना कैफ पुन्हा एकदा या चित्रपटात त्याच्यासोबत असेल. त्याचबरोबर इमरान हाश्मीला चित्रपटात खलनायक म्हणून स्थान मिळाले आहे. मनीष शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

याशिवाय, सलमान खान 'अंतिम- द फाइनल ट्रूथ' (Antim - The Final Truth) या चित्रपटातही असणार आहे. यामध्ये तो मेव्हणा आयुष शर्मासोबत लढताना दिसणार आहे. सध्या, सलमान खान त्याच्या लोकप्रिय शो बिग बॉसच्या 15 व्या सीझनला होस्ट करत आहे.

हेही वाचा - आर्यनसारख्या मुलांऐवजी खुनी, बलात्काऱ्यांना पकडण्यावर भर द्यावा - सोमी अली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.