मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं बॉलिवूडमध्ये एक वेगळं प्रस्थ पाहायला मिळतं. आजवर त्याने बरेच सुपरडुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याची लोकप्रियताही अफाट आहे. बॉलिवूडमध्ये सलमानने तब्बल ३१ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त त्याने सोशल मीडियावर त्याच्या बालपणीचा एक फोटो शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत.
'मैने प्यार किया' या चित्रपटातून सलमान खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर एका रात्रीत तो स्टार झाला. त्याने बऱ्याच कौटुंबिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. त्यामुळे चाहत्यांच्या मनात त्याचे वेगळे स्थान आहे.
'चाहत्यांनी दिलेल्या प्रेमामुळेच आजवर इथपर्यंत पोहोचलो. तुमचे प्रेम असेच कायम असू द्या', असा भावनिक संदेश लिहून त्याने त्याच्या अगदी बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तसेच, चित्रपटसृष्टीचेही त्याने आभार मानले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सलमान खानने छोट्या पडद्यावरही प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. बिग बॉस ते 'दस का दम' या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन केले आहे. त्याच्या 'बिग बॉस' या कार्यक्रमाला तर प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो. लवकरच तो 'दबंग ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २० डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.