ETV Bharat / sitara

'या' अभिनेत्याला सलमान आणि कॅटरिना मानतात गुरू, वाचा कारण - ali abbas jafar

सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षीत 'भारत' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सलमान खानचा 'रेस-३' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर 'भारत' चित्रपटाकडून चाहत्यांना फार अपेक्षा आहेत.

'या' अभिनेत्याला सलमान आणि कॅटरिना मानतात गुरू, वाचा कारण
author img

By

Published : May 5, 2019, 2:52 PM IST

मुंबई - सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षीत 'भारत' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सलमान खानचा 'रेस-३' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर 'भारत' चित्रपटाकडून चाहत्यांना फार अपेक्षा आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुनिल ग्रोव्हर. या चित्रपटात सलमानच्या खास मित्राच्या भूमिकेत तो दिसणार आहे. खऱ्या आयुष्यातही ते दोघे चांगले मित्र आहेत. एवढंच नाही, तर सलमान आणि कॅटरिना हे दोघेही त्याला आपला गुरू मानतात.

होय, सुनिल ग्रोव्हरची लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 'कपिल शर्मा शो'मधून तो 'गुथ्थी' आणि 'डॉ. गुलाटी'ची भूमिका साकारत असे. तेव्हापासूनच त्याचे फॅन फॉलोविंगही वाढले आहे. सध्या 'भारत' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सलमान आणि कॅटरिनासोबत तो देखील प्रमोशन करत आहे.

Sunil Grover
सुनिल ग्रोव्हर

एका माध्यमाच्या मुलाखतीत सलमान आणि कॅटरिनाने सुनिल ग्रोव्हरचे भरभरुन कौतुक केले. सलमानने त्याच्याबद्दल सांगितले, की 'सुनिल फक्त एक प्रभावशाली कलाकारच नाही, तर तो उत्तम मिमिक्री आर्टिस्ट आहे. कोणत्याही भूमिकेत तो स्वत:ला झोकुन देतो. इतर कलाकारांचाही तो सन्मान करतो. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्यासोबत मला काम करायला मिळाले. तो खूप हुशार व्यक्ती आहे'.

कॅटरिनाही सुनिलचे कौतुक करताना म्हणाली, की 'शूटिंगच्या दरम्यान सुनिल आणि मी अनेक विषयांवर बोलायचो. सुनिलला प्रत्येक क्षेत्रातील माहिती आहे. तो असा व्यक्ती आहे, की ज्याच्यासोबत आपण कोणत्याही विषयावर तासनतास बोलू शकतो. त्याच्यासोबत वेळ घालवणे खूप मजेशीर होते. तो आमचा एकप्रकारे गुरूच आहे'.
'भारत' चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सलमान खानच्या विविध रूपातील भूमिका पाहायला मिळणार आहेत.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.