मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर काही वेळातच त्याच्या पार्थिवाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरूवात झाली होती. कोणताही विचार न करता लोक तो फोटो शेअर करत सुटले होते. याला थांबवण्यासाठी कोणीच पाऊल टाकत नव्हते.
हेही वाचा - सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण : 'त्या' 5 निर्मात्यांची होणार चौकशी
या प्रकारामुळे व्यथित झालेल्या निर्माता साजिद नादियाडवाला यांनी तातडीने अॅक्शन घेतली आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना या फोटोंचा प्रसार थांबवण्याची विनंती केली. यासाठी विनंती करणारे एक पत्रही त्यांनी गृहमंत्र्यांना पाठवले. हे पत्र मिळताच अधिकाऱ्यांनी तातडीने अॅक्शन घेतली. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाने सुशांतचा मृतावस्थेतील फोटो शेअर न करण्याची ताकीद जारी केली. असे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांमार्फत देण्यात आला होता.
हेही वाचा सुशांत सिंहच्या अस्थींचे शोकाकूल वातावरणात झाले गंगेमध्ये विसर्जन...