ETV Bharat / sitara

'सगळी झाडं कापा, नंतर बसा बोंबलत' 'आरे' वृक्षतोडीवर सई ताम्हणकरचा संताप - save aare

सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेही आपला संताप व्यक्त केला आहे.  अभिनेत्री सई ताम्हणकरने ट्विटरच्या माध्यमातून 'आरे'तील वृक्षतोडीवर तीव्र शब्दांत राग व्यक्त केला.

'सगळी झाडं कापा, नंतर बसा बोंबलंत' 'आरे' वृक्षतोडीवर सई ताम्हणकरचा संताप
author img

By

Published : Oct 6, 2019, 7:20 PM IST

Updated : Oct 6, 2019, 9:30 PM IST

मुंबई - मेट्रोच्या कारशेडसाठी 'आरे' परिसरातील हजारो झाडी रात्रभरात कापण्यात आली. या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींसह कलाविश्वातील कलाकारांनीही विरोध दर्शवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेही आपला संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरने ट्विटरच्या माध्यमातून 'आरे'तील वृक्षतोडीवर तीव्र शब्दांत राग व्यक्त केला.

‘कापा. सगळी झाडं कापा. नंतर बसा बोंबलंत. जेवढी झाडं कापतायत तेवढीच परंत लावणार का?’ अशा शब्दांत सईने ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

वृक्षतोडीच्या कारवाईमुळे पर्यावरणप्रेमींमध्येच नाही तर सामान्य नागरिकांमध्येही संताप उमटत आहे.

हेही वाचा -'आरे'तील वृक्षतोड बेकायदेशीर नाही का? बॉलिवूडकरांनी व्यक्त केला संताप

आरेच्या कारशेडसाठीच्या वृक्षतोडीसाठी अनेक सेलिब्रिटिंनीही ट्विट केले. यामध्ये फरहान अख्तर, दिया मिर्झा, श्रद्धा कपुर, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, आलिया भट, विशाल ददलानी या सेलिब्रिटींनी वृक्ष तोडीवर अतिशय कडव्या शब्दात टीका केली. 'रात्रीच्या वेळेत वृक्ष तोड करण्याची काय गरज होती', असा सवालही अनेक सेलिब्रिटींनी केला आहे.

हेही वाचा -'आज त्यांचा प्रवास संपवला, कालांतराने तुमचाही....', 'आरे' वृक्षतोडीवर तेजस्विनीने मांडली व्यथा

Intro:Body:

Prime Minister 

Conclusion:
Last Updated : Oct 6, 2019, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.