ETV Bharat / sitara

गणेश गायतोंडे परतलाय, 'सेक्रेड गेम्स २' चा ट्रेलर प्रदर्शित - saif ali khan

सेक्रेड गेम्सच्या या पर्वामध्ये गणेश गायतोंडे म्हणजेच नवाजुद्दीनच्या लुकची खूप चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन सूटमध्ये दिसला होता.

गणेश गायतोंडे परतलाय, 'सेक्रेड गेम्स २' चा ट्रेलर प्रदर्शित
author img

By

Published : Jul 9, 2019, 4:38 PM IST

मुंबई - नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय ठरलेली वेबसीरिज 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या पर्वाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या वेबसीरिजमधल्या गणेश गायतोंडे, सरदारजी या व्यक्तीरेखा प्रेक्षकांच्या मनात ठासून भरल्या होत्या. त्यामुळे प्रेक्षकांची दुसऱ्या पर्वाची उत्सुकता ताणली गेली होती. आता 'सेक्रेड गेम्स -२' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलमध्ये गणेश गायतोंडे म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीची दमदार झलक पाहायला मिळते.

'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या भागात गणेश गायतोंडे (नवाझुद्दीन सिद्दीकी) मेलेला दाखवण्यात आला होता. त्यामुळे सरताज सिंहला संकट टळलं असं वाटत होतं. मात्र 'सेक्रेड गेम्स २' च्या ट्रेलरमध्ये तो परत आलेला दाखवण्यात आला आहे. तो सरताजला एक मेसेज पाठवतो, ज्यात लिहिलेलं असतं की युद्धाची वेळ आली आहे. आता हा मेसेज पाठवणारा कोण आहे, हे मात्र कोणालाच माहित नसते. त्यामुळे सरताज या संकटाचा सामना करायला तयार असतो. मात्र, त्याचा शत्रू कोण आहे हे त्याला माहीत नसतं. दमदार संवाद आणि नवाझुद्दीनचा तेवढ्याच ताकदीचा अभिनय या ट्रेलरमध्ये पहायला मिळतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सेक्रेड गेम्सच्या या पर्वामध्ये गणेश गायतोंडे म्हणजेच नवाजुद्दीनच्या लुकची खूप चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन सूटमध्ये दिसला होता. नवाजुद्दीनने 'पिछली बार क्या बोला था गणेश भाई को ? औकात...' असं कॅप्शन त्याच्या इन्स्टाग्राम पोस्ट दिले होते. त्यामुळे यावेळी या सीझनमध्ये मोठा धमाका होणार हे निश्चित आहे.

नवाजुद्दीनसोबत या सीरिजमध्ये सैफ अली खान, पंकज त्रिपाठी, कल्की कोचलीन आणि रणवीर शौरी यांचीदेखील भूमिका पाहायला मिळणार आहे. ही वेबसीरिजदेखील १५ ऑगस्टरोजीच प्रदर्शित होत आहे. १५ ऑगस्टला 'साहो', 'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस' हे तीन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहे. आता सेक्रेड गेम्स-२ ची देखील यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे डिजीटल विरूद्ध बॉलिवूड असा सामना रंगताना दिसणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.