ETV Bharat / sitara

वादाच्या भोवऱ्यात 'साहो' : निर्मात्यावर लिसा रेने केला 'चोरी'चा आरोप - controversy:

अभिनेत्री लिसा रे हिने 'साहो'च्या निर्मात्यांवर चोरीचा आरोप केला आहे. चित्रपटातील एका गाण्यातील बॅकग्राऊंड शिलो शिव सुलेमान यांचे असून त्याला कल्पना न देताच त्याचा वापर केल्याचा पुरावाच तिने दिलाय.

लिसा रेचा साहो निर्मात्यावर आरोप
author img

By

Published : Aug 31, 2019, 12:54 PM IST

Updated : Aug 31, 2019, 1:13 PM IST

मुंबई - अभिनेत्री लिसा रे हिने 'साहो'च्या निर्मात्यावर चोरीचा आरोप लावला आहे. इन्स्टाग्रामवर दोन फोटो टाकत तिने पोस्ट लिहिली आहे. लिसाने म्हटलंय की, 'साहो'च्या निर्मात्यांनी आर्टिस्ट शिलो शिव सुलेमान यांच्या आर्ट वर्कची कॉपी केली असून आपल्या पोस्टरवर त्याचा वापर केलाय.

लिसा रे हिने शेअर केलेल्या पोस्टरमधील एक पोस्टर आर्टिस्ट शिलो शिव सुलेमान यांनी बनवलेले मुळ पोस्टर असून दुसरे पोस्टर 'साहो'चे आहे. यामध्ये स्पष्ट दिसते की, 'साहो'च्या निर्मात्यांनी सुलेमानच्या कलाकृतीची थेट चोरी केली आहे. यातील डिझाईन, आर्ट वर्क आणि रंगसंगती हेबुहुब वापरण्यात आली आहे. 'साहो'च्या पोस्टरमध्ये प्रभास आणि श्रध्दा यांचे फोटो टाकून मुळ कलाकृतीशी छेडछाड केली आहे.

लिसाने लिहिलंय, ''आपल्याला पुढे येऊन बोलले पाहिजे. या निर्मात्यांना आरसा दाखवून सांगितले पाहिजे की, हे योग्य नाही. शिलोचे मुळ पेंटींगशी छेडछाड केली गेली असून मोठ्या बजेटच्या या सिनेमात याचा वापर केला गेलाय. ही प्रेरणा नसून उघडपणे चोरी आहे. हे संपूर्ण जागत कधीच स्वीकारार्ह नाही.''

प्रॉडक्शनने या कलाकाराशी संपर्क करण्याचा अथवा परवानगी घेण्याचा किंवा त्याला श्रेय देण्याचा प्रयत्नही केलेला नाही. हे योग्य नाही. हे चित्र 'साहो'मधील 'बेबी वॉन्ट यू टेल मी' या गाण्याच्या प्रसंगाचे आहे. पोस्टरच्या मागे जे डिझाईन आहे तसेच डिझाईन लिसाने शेअर केलेल्या चित्रात आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीवर निशाणा साधत लिसाने म्हटलंय की, कथित प्रेरणेच्या नावाखाली कथा चोरीचे प्रकार वाढले आहेत. लिसाने आपला मुद्दा एक प्रश्न उपस्थित करुन पूर्ण केला आहे. ती म्हणते, ''कोणी चोर जर तुमच्या घरात घुसून तुची सर्वात किंमती वस्तु चोरेल तेव्हा तुम्हाला कसे वाटेल?''

लिसाच्या या आरोपानंतर अद्यापही 'साहो'च्या निर्मात्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सुजीत यांनी दिग्दर्शित केलेला 'साहो' हा चित्रपट ३० ऑगस्टला देशभर रिलीज झाला. या अॅक्शन थ्रिलरमध्ये प्रभास, श्रद्धा कपूर, एवलिन शर्मा, मंदिरा बेदी आणि नील नितिन मुकेश यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 31, 2019, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.