मुंबई - नाटक आणि टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेली अभिनेत्री ऋतुजा बागवे एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. "शहीद भाई कोतवाल" या चित्रपटात ती भाई कोतवालांच्या पत्नीच्या म्हणजेच इंदू कोतवाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
ऋतुजानं आतापर्यंत मालिका आणि नाटकातून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. आता "शहीद भाई कोतवाल" सारख्या इतिहासावर आधारित चित्रपटातही ती आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवेल यात काहीच शंका नाही. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत असल्यानं प्रेक्षकांना फार वाट पाहावी लागणार नाही.
हेही वाचा -'मिस्टर लेले' चित्रपटात 'या' दोन ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार वरुण
स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील, एकनाथ महादू देसले यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील भूमिकांमध्ये उत्तमोत्तम कलाकार दिसणार आहेत. त्यात ऋतुजाची भूमिका लक्षवेधी ठरणार आहे.
हेही वाचा -Flashback 2019 : आघाडीच्या नायकांना आयुष्मान खुरानाची दमदार टक्कर