ETV Bharat / sitara

टॉलिवूड फोटोगॉफर 'असा' करत होता रशियन मॉडेलचा छळ; अलेक्झांड्राच्या मृत्यूचे गूढ उकलेले - तामिळ चित्रपट

शिवोली येथे 20 ऑगस्टला दोन रशियन तरुणीचे मृतदेह आढळून आले होते. त्यात 24 वर्षीय अलेक्झांड्रा या तरुणीचा समावेश होता. तामिळ चित्रपट सृष्टीत काम करत असताना एका छायाचित्रकाराने तिची काही आक्षेपार्ह छायाचित्रे काढली होती. आणि ही अश्लील छायाचित्र व्हायरल कारायच्या धमक्या देत तरुण तिला ब्लॅकमेल करत होता. याविषयी तिने चेन्नई पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. वाचा पुढे काय झाले...

Russian model Alexandra's unraveled of mystery the death in panji
रशियन मॉडेल अलेक्झांड्राच्या मृत्यूचे गूढ उकलेले
author img

By

Published : Aug 23, 2021, 9:52 PM IST

पणजी - मागच्या आठवड्यात उत्तर गोव्यातील शिवोली येथे आत्महत्या केलेल्या दोन रशियन तरुणीपैकी अलेक्झांड्रा या तरुणीच्या मृत्यूचे गूढ उकलेले आहे. चेन्नईतील एक छायाचित्रकाराच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी चेन्नई पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. या रशियन तरुणीने तामिळ चित्रपट सृष्टीत काम केले होते. कांचना ३ चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. तसेच ती मॉडेलिंग क्षेत्रांतही काम करत होती.

Russian model Alexandra's death
रशियन मॉडेल अलेक्झांड्रा

मानसिक तणावातून केली आत्महत्या -

शिवोली येथे 20 ऑगस्टला दोन रशियन तरुणींचे मृतदेह आढळून आले होते. त्यात 24 वर्षीय अलेक्झांड्रा या तरुणीचा समावेश होता. तामिळ चित्रपट सृष्टीत काम करत असताना एका छायाचित्रकाराने तिची काही आक्षेपार्ह छायाचित्रे काढली होती. ही अश्लिल छायाचित्रे व्हायरल कारण्याच्या धमकी देत तो तरुण तिला ब्लॅकमेल करत होता. याविषयी तिने चेन्नई पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांनतर त्या तरुणाला अटकही करण्यात आली होती. तेव्हापासून ही रशियन तरुणी मानसिक तणावाखाली होती. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.

Russian model Alexandra's death
कंचना ३ मध्ये होती मुख्य भूमिकेत

कंचना ३ मध्ये होती मुख्य भूमिकेत -

अलेक्झांड्रा डिजवी (Alexandra Djavi) ही रशियन तरुणी आपल्या मित्रासोबत शिवोली येथे राहत होती. २० ऑगस्टला तिने आत्महत्या केली होती. मागच्या काही दिवसांपासून ती मानसिक तणावाखाली होती. तपास करत असताना तिच्या मित्राने दिलेल्या जबाबावरुन पोलिसांना तिच्या मृत्यूचे धागेदोरे मिळाले. या तरुणीने तमिळ भाषेत प्रदर्शित झालेल्या 'कंचना ३' या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट राधवा लॉरेन्स यांनी दिग्दर्शित केला होता. हास्य आणि भयपट असलेल्या या चित्रपटाला सिनेरसिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

अलेक्झांड्राच्या मृत्यूने गोवा पुन्हा चर्चेत -

या रशियन तरुणीच्या मृत्यूने गोवा पुन्हा चर्चेत आले आहे. तामिळ चित्रपट सृष्टीत काम करून यश मिळवल्यामुळे तिच्या मृत्यमुळे चित्रपट सृष्टी, समाजमाध्यवर उलटसुलट चर्चांना उत आला आहे. तिच्या या मृत्यूबद्दल रशियन भाषेतही फेसबुक, ट्विटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका रशियन तरुणीने भारतात येऊन तामिळ संस्कृतीचा अभ्यास करून एवढे मोठे यश मिळविणे व अचानक तिचा गोव्यात मृत्यू होणे ही धक्कादायक बाब समजली जाते.

हेही वाचा - Corona Third Wave : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अटळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.