ETV Bharat / sitara

'झुठा कहीं का' नंतर आणखी ३ चित्रपटात झळकणार ऋषी कपूर, न्युयॉर्कमध्येच साईन केले चित्रपट - zoota kahin ka

ऋषी कपूर यांच्या 'झुठा कहीं का' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ते अभिनेता जिमी शेरगीलसोबत भूमिका साकारणार आहेत. सप्टेंबर महिन्यात ऋषी कपूर भारतात परतणार आहेत.

'झुटा कहीं का' नंतर आणखी ३ चित्रपटात झळकणार ऋषी कपूर, न्युयॉर्कमध्येच साईन केले चित्रपट
author img

By

Published : Jul 15, 2019, 9:24 PM IST

मुबंई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर बऱ्याच दिवसांपासून न्यूयॉर्क येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. लवकरच ते भारतात परतणार आहेत. भारतात परतल्यावर लगेच ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होणार आहेत.

त्यांचा 'झुठा कहीं का' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानंतर आणखी ३ चित्रपटांसाठी त्यांनी होकार दिला आहे. न्युयॉर्कमध्येच त्यांनी आगामी ३ चित्रपट साईन केले आहेत.

ऋषी कपूर यांच्या 'झुठा कहीं का' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ते अभिनेता जिमी शेरगीलसोबत भूमिका साकारणार आहेत. सप्टेंबर महिन्यात ऋषी कपूर भारतात परतणार आहेत. त्यानंतर ते उर्विरीत चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करतील.

अलिकडेच अभिनेते शक्ती कपूर यांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. ऋषी कपूर हे शक्ती कपूरसोबत दररोज संवाद साधतात. तसेच उपचारादरम्यान त्यांनी ३ चित्रपटांना होकार दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

ऋषी कपूर यांची आत्तापर्यंत बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी न्यूयॉर्क येथे जाऊन भेट घेतली आहे. उद्योगपती अनिल आणि मुकेश अंबानी यांनीदेखील त्यांची भेट घेतली. नीतू कपूर त्यांच्या तब्येतीचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असतात. तसेच, त्यांच्यासोबतचे फोटोदेखील शेअर करत असतात.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.