ETV Bharat / sitara

...अखेर रिंकूची 'ही' इच्छा झाली पूर्ण, शेअर केला फोटो - Rinku Rajguru latest news

अलिकडेच रिंकूने या अभिनेत्याची भेट घेतली. तसेच त्याच्यासोबतचा फोटोदेखील शेअर केला आहे.

Rinku Rajguru with Vicky Koushal, Rinku Rajguru attend Special screening of Bhoot, Rinku Rajguru dream comes true, Rinku Rajguru latest news, Rinku Rajguru news
...अखेर रिंकूची 'ही' इच्छा झाली पूर्ण, शेअर केला फोटो
author img

By

Published : Feb 20, 2020, 7:05 PM IST

मुंबई - 'सैराट' फेम 'आर्ची' म्हणजे रिंकू राजगुरू हिची तरुणाईमध्ये खास क्रेझ पाहायला मिळते. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वीच रिंकूचा 'मेकअप' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रिंकूचा नेहमीप्रमाणेच बिनधास्त अंदाज पाहायला मिळाला. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान रिंकूने बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अलिकडेच रिंकूने या अभिनेत्याची भेट घेतली. तसेच त्याच्यासोबतचा फोटोदेखील शेअर केला आहे.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हँडसम हंक विकी कौशल आहे. विकी कौशल हा रिंकूचा आवडता अभिनेता आहे. एका कार्यक्रमात विकीला डेट करण्याची इच्छा असल्याचे रिंकूने सांगितले होते. सध्या विकी त्याच्या आगामी 'भूत' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंगही आयोजित करण्यात आली होती. यावेळी रिंकूने विकीची भेट घेतली.

हेही वाचा -वडील आणि मुलीमधले भावबंध उलगडणारं 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

रिंकूने विकीसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहे. 'एकदाची तुझी इच्छा पूर्ण झाली', अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोवर दिल्या आहेत.

हेही वाचा -भूताची भीती टाळण्यासाठी विकी कौशल करतो 'हा' उपाय, 'भूत' चित्रपटाचा उलगडला प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.