ETV Bharat / sitara

'मेकअप'साठी रिंकू -चिन्मय सोलापूरात... - Film,marathi,makeup,new,reales,tumhi,rajguru,chinmay,udagirkar,promotion,2020

मेकअप या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता चिन्मय उदगिरकर हे आज सोलापूरात आले होते. त्यांनी शहरातील महाविद्यालयांत जाऊन युवा वर्गाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या एंट्रीला धमाल प्रतिसाद मिळाला.

Rinku and Chinmay
रिंकू -चिन्मय सोलापूरात
author img

By

Published : Feb 4, 2020, 12:01 AM IST

सोलापूर : येत्या 7 तारखेला प्रदर्शित होणाऱ्या मेकअप या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता चिन्मय उदगिरकर हे आज सोलापूरात आले होते. त्यांनी शहरातील महाविद्यालयांत जाऊन युवा वर्गाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या एंट्रीला धमाल प्रतिसाद मिळाला.

रिंकू -चिन्मय सोलापूरात...

मेकअप'चं पोस्टर सुरुवातीला प्रेक्षकांना संभ्रमात टाकणारे होते.यात रिंकूची दोन वेगवेगळी रूपं होती. त्यामुळे तिचा डबल रोल आहे का,याचा विचार सुरु असतानाच 'मेकअप'चा टिझर प्रदर्शित झाला. हळूहळू या 'मेकअप'चा उलगडा होत असतानाच हा 'मेकअप' अधिक गडद करण्यासाठी ट्रेलरही प्रेक्षकांसाठी दाखल झाला.वरवर पाहता हा मेकअप फक्त चेहऱ्याचा दिसत असला तरी या चित्रपटातून मेकअपचे अनेक पैलू उलगडणार आहेत.

ट्रेलर एकदम धमाल असतानाच त्यात अनेक ट्विस्टही दिसत आहेत. एकीकडे लग्नासाठी मुले बघणारी, त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी दुसरीकडे मात्र बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसतेय. त्यामुळे दोघींपैकी खरी पूर्वी कोण आणि मुळात पूर्वीने हा 'मेकअप' का केला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून ते चित्रपट पाहिल्यावरच सुटतील.. त्यासोबतच चित्रपटातील गाणीही श्रवणीय आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील 'गाठी गं' हे साखरपुड्याचे गाणे प्रदर्शित झाले. प्रत्येकालाच थिरकायला लावणाऱ्या या गाण्याला शाल्मली खोलगडे हिचा आवाज लाभला आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:सोलापूर : येत्या 7 तारखेला प्रदर्शित होणाऱ्या मेकअप या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता चिन्मय उदगिरकर हे आज सोलापूरात आले होते.त्यांनी शहरातील महाविद्यालयांत जाऊन युवा वर्गाशी संवाद साधला.त्यावेळी त्यांच्या एंट्रीला धमाल प्रतिसाद मिळाला.

Body:'मेकअप'चं पोस्टर सुरुवातीला प्रेक्षकांना संभ्रमात टाकणारे होते.यात रिंकूची दोन वेगवेगळी रूपं होती.त्यामुळे तिचा डबल रोल आहे का,याचा विचार सुरु असतानाच 'मेकअप'चा टिझर प्रदर्शित झाला.हळूहळू या 'मेकअप'चा उलगडा होत असतानाच हा 'मेकअप' अधिक गडद करण्यासाठी ट्रेलरही प्रेक्षकांसाठी दाखल झाला.वरवर पाहता हा मेकअप फक्त चेहऱ्याचा दिसत असला तरी या चित्रपटातून मेकअपचे अनेक पैलू उलगडणार आहेत.

Conclusion:ट्रेलर एकदम धमाल असतानाच त्यात अनेक ट्विस्टही दिसत आहेत.एकीकडे लग्नासाठी मुले बघणारी,त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी दुसरीकडे मात्र बिनधास्त,स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसतेय.त्यामुळे दोघींपैकी खरी पूर्वी कोण आणि मुळात पूर्वीने हा 'मेकअप' का केला,असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून ते चित्रपट पाहिल्यावरच सुटतील.. त्यासोबतच चित्रपटातील गाणीही श्रवणीय आहेत.काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील 'गाठी गं' हे साखरपुड्याचे गाणे प्रदर्शित झाले.प्रत्येकालाच थिरकायला लावणाऱ्या या गाण्याला शाल्मली खोलगडे हिचा आवाज लाभला आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.