ETV Bharat / sitara

Republic Day 2022: देशप्रेमाने प्रेरित करणारे बॉलिवूड चित्रपट

author img

By

Published : Jan 26, 2022, 6:23 AM IST

बॉलिवूडमध्ये असे अनेक देशभक्तीपर चित्रपट बनले आहेत जे त्यांच्या कथांमुळे तुमचे डोळे ओले करु शकतात. तुमच्यातील देशभक्ताला प्रेरित करण्यासाठी तुम्ही खाली दिलेले चित्रपट पाहिले नसतील तर पाहून प्रजासत्ताक दिन 2022 साजरा करू शकता.

देशभक्तीपर चित्रपट
देशभक्तीपर चित्रपट

मुंबई - भारत बुधवारी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना सध्या सुरू असलेल्या कोविड-19 साथीमुळे पूर्वी इतक्या उत्साहाने आपण वागू शकत नाही. परंतु आपल्या मनातील देशभक्ती जागवण्यासाठी बॉलिवूडने सतत प्रेरणादायी देशभक्तीपर चित्रपट बनवले आहेत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावर निर्बंध असले तरी या भावनेची कदर करणारे चित्रपट पाहून आपले देशप्रेम नक्कीच वृध्दिंगत करु शकतो.

स्वदेस (२००४):

देशभक्तीपर चित्रपट
देशभक्तीपर चित्रपट

चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित स्वदेश हा चित्रपट शाहरुख खानचा आजवरचा सर्वोत्तम चित्रपट म्हणता येईल. नासाचा एक शास्त्रज्ञ पुन्हा आपल्या मातृभूमीच्या प्रेमात कसा पडतो याभोवती कथानक फिरते. तो भारतात स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतो आणि आपले बालपणीचे मूळ गाव विकसित करण्यासाठी आपले जीवन समर्पित करतो. सकारात्मक पुनरावलोकने असूनही हा चित्रपट व्यावसायिक अपयशी ठरला. तथापि, अनेकांना असे वाटते की हा 'खऱ्या भारताचा' उत्सव होता.

रंग दे बसंती (2006):

देशभक्तीपर चित्रपट
देशभक्तीपर चित्रपट

जवळपास 16 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला आमिर खानची भूमिका असलेला हा चित्रपट मित्रांच्या एका गटाच्या प्रवासाभोवती फिरतो आणि अधिकार असलेल्यांना प्रश्न करण्याची आवश्यकता अधोरेखित करतो. चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त रिव्ह्यू मिळवून मोठा हिट ठरला.

एअरलिफ्ट (2016):

देशभक्तीपर चित्रपट
देशभक्तीपर चित्रपट

अक्षय कुमार आणि निम्रत कौर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात कुवेत शहरात अडकलेल्या एका यशस्वी व्यावसायिकाची कथा दाखवण्यात आली होती. जेव्हा इराकने आक्रमण केले आणि परिणामी हजारो भारतीय युद्धक्षेत्रात अडकले होते. चित्रपटाचे कथानक सत्य घटनांपासून प्रेरित होते आणि भारतीय नागरिकांची सुटका होण्यापूर्वी आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने घरी आणण्याआधी काय झाले याचे वास्तविक चित्रण यात केले होते.

राझी (२०१८):

देशभक्तीपर चित्रपट
देशभक्तीपर चित्रपट

मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाने आलिया भट्टच्या चित्रपट कारकिर्दीत आणखी एक यश मिळवले. हरिंदर सिंग सिक्का यांच्या 'कॉलिंग सेहमत' या कादंबरीवरून साकारलेला हा चित्रपट सेहमत खान या तरुण काश्मिरी मुलीची प्रेरणादायी कथा आहे, जी इक्बाल सय्यद या पाकिस्तानी लष्करी अधिकारी (विकी कौशल)शी लग्न करते आणि भारतीय गुप्तहेर म्हणून पाकिस्तानात जाते. पाकिस्तानकडून महत्त्वाची माहिती शोधून तिच्या देशाला मदत करण्याची तिची धैर्य यामुळे चित्रपट एका उंचीवर पोहोचतो.

उरी: द सर्जिकल स्ट्राइक (2019):

देशभक्तीपर चित्रपट
देशभक्तीपर चित्रपट

विकी कौशल आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रजासत्ताक दिनी पाहू शकणार्‍या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे यात शंका नाही. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकभोवती याचे कथानक फिरते. हा चित्रपट लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला.

सरदार उधम (२०२१):

देशभक्तीपर चित्रपट
देशभक्तीपर चित्रपट

सरदार उधम हे एक महाकाव्य चरित्रात्मक ऐतिहासिक ड्रामा चित्रपट आहे. स्वातंत्र्य क्रांतिकारक उधम सिंग यांच्या जीवनाचे दस्तऐवजीकरण यात पाहायला मिळते. ज्याने अमृतसरमधील १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी लंडनमध्ये मायकेल ओडवायरची हत्या केली होती. विकी कौशल, अमोल पराशर आणि बनिता संधू यांची प्रमुख भूमिका असलेला शूजित सरकार दिग्दर्शित हा चित्रपट गेल्या ऑक्टोबरमध्ये रिलीज झाल्यापासून समीक्षक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रशंसकांच्या केंद्रस्थानी आहे.

राष्ट्राचा आदर करण्यात आणि देशभक्तीची बाजू प्रेक्षकांसमोर आणण्यात बॉलीवूड कधीही मागे राहिले नाही. नागरिकांचे आपल्या राष्ट्राप्रती असलेले प्रेम आणि त्यासाठी ते काहीही आणि सर्वकाही कसे करू शकतात याचे चित्रण या चित्रपटांनी केले आहे. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

हेही वाचा - 'पावनखिंड'मध्ये दिसणार रायाजी कोयाजी बंधूंचा थरारक लढा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.