मुंबई - अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही जोडी बॉलिवूडची लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. दोघंही एकमेकांप्रती असलेलं प्रेम खुलेपणानं व्यक्त करत असतात. सोशल मीडियावरही दोघांची चांगलीच क्रेझ आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला नोव्हेंबर महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. तरीही त्यांच्या नात्यात नेहमी चैतन्य पाहायला मिळतं. आपल्या संसारात दीपिकाकडुन नेमकं काय शिकायला मिळतं, याचा खुलासा रणवीरनं केला आहे.
'आजकाल सर्वात जास्त व्यग्र करिअर असणाऱ्यांमध्ये माझा समावेश होतो. आपल्या सर्वांना शानशौकीने राहायला आवडतं. त्यासाठी आपण बरीच मेहनत घेत असतो. मी जे काही करतो, ते मनापासून करतो. मला माझा जॉब आवडतो. मात्र, मी संसार आणि करिअर यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. जेव्हाही मला वेळेचं नियोजन करायचं असतं, तेव्हा मी माझी सर्वात सुंदर पत्नी दीपिकाकडून याचे सल्ले घेत असतो. दीपिका वेळेचं नियोजन करण्यात अगदी तरबेज आहे. मी देखील तिच्याकडुन हे शिकत असतो, असं रणवीर म्हणाला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -करण जोहरने किंग खानला दिली 'ही' खास भेट, पाहा काय आहे
अलिकडेच त्याची फ्रँक मुलर या घडाळाच्या ब्रँड अँम्बॅसडरपदी निवड झाली आहे. मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्याने माध्यमांशी बोलताना हा खुलासा केला.
आयुष्यात तुझ्यासाठी चैन असणे म्हणजे काय, असा प्रश्न त्याला यावेळी विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, 'एक दिवसाची सुट्टी मिळणे ही माझ्यासाठी चैन आहे. मला माझ्या पत्नीसोबत वेळ घालवायला जरी मिळाला तरी ती माझ्यासाठी एकप्रकारची चैनच आहे', असं तो म्हणाला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'हाऊसफुल ४'च्या टीमची रेल्वेमध्ये धमाल, अक्षयने मानले रेल्वे प्रशासनाचे आभार
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, रणवीर '८३' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दीपिका लग्नानंतर पहिल्यांदाच त्याच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षी १० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -'पहला वोट पहला प्यार', धमाल रॅपच्या माध्यमातून मुंबईच्या रॅपर्सचं मतदानासाठी आवाहन