मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या सौंदर्याचे बरेच चाहते आहेत. तिच्या अभिनयामुळे तिने मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. तिने ५ जानेवारीला आपला ३४ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, रणवीर सिंगने दीपिकाला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
रणवीरने दीपिकाच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अतिशय क्युट दिसत आहे. 'हॅप्पी बर्थडे टू माय लिटील मार्शमॅलो', असं कॅप्शन देऊन त्याने हा फोटो फोटो पोस्ट केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'छपाक'च्या सेटवर दीपिकाने साजरा केला वाढदिवस
एकिकडे दीपिकाचे ग्लॅमरस फोटो व्हायरल होत असताना रणवीरने शेअर केलेला हा क्युट फोटोने मात्र चाहत्यांना चांगलीच भूरळ पाडली आहे. आत्तापर्यंत या फोटोला २० लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.
अलिकडेच दीपिका आणि रणवीरला विमानतळावर स्पॉट करण्यात आले. दोघेही दीपिकाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी विदेशात रवाना झाले आहेत.
हेही वाचा -B'Day Spl: दीपिकाच्या 'या' भूमिकांनी जिंकली प्रेक्षकांची मने
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, दीपिका सध्या तिच्या 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'छपाक'च्या टीमसोबतही तिने आपला वाढदिवस साजरा केला. हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर, दुसरीकडे रणवीर सिंग देखील '८३' चित्रपटात भूमिका साकारत आहे. दीपिकाचीही यामध्ये लहानशी भूमिका आहे. या चित्रपटाशिवाय तो 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटातही गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच 'सूर्यवंशी' चित्रपटातही त्याची झलक पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची 'ईटीव्ही भारत'ला भेट