मुंबई - अभिनेता रणवीर सिंग सध्या लोकप्रियतेच्या यशोशिखरावर पोहोचला आहे. त्याचा बिनधास्त अंदाज, दिलखुलास स्वभाव आणि दमदार अभिनयामुळे तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. सध्या तो त्याच्या आगामी 'गली बॉय' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलिकडेच त्याने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'सुपर डान्सर' या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये स्वत:चीच गोष्ट पाहुन तो भावुक झालेला दिसला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुपर डान्सर या रिअॅलिटी शोमध्ये त्याच्याच जीवनप्रवास डान्सद्वारे सादर करण्यात आला होती. गौरव सारवान या बालकलाकाराने हा परफॉर्मन्स दिला होता. त्याचा परफॉर्मन्स पाहून रणवीरला अश्रु आवरणं शक्य झालं नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, की माझा प्रवास अशाप्रकारे माझ्यासमोर येईल. वेळ फार बदलली आहे. जे जे मी स्वप्नात पाहिलं होतं, ते मला मिळालं, यावर विश्वास बसत नाही. तुमच्या परफॉर्मन्समुळे मी भारावुन गेलो आहे. हा क्षण माझ्यासाठी खूप अनमोल आहे', अशा भावना रणवीरने हा डान्स पाहुन व्यक्त केल्या.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
यावेळी रणवीरसह सुपरडान्सरचे परिक्षक गीता, शिल्पा शेट्टी आणि पाहुणी म्हणून आलेली आलिया यांनाही आपले अश्रु अनावर झाले. सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल होत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">