मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित असलेल्या '८३' चित्रपटाचे टीझर पोस्टर प्रदर्शित झाले आहे. रणवीरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटातील सर्व कलाकारांचा दमदार लुक या टीझर पोस्टरमध्ये पाहायला मिळतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
१९८३ साली झालेल्या विश्वचषक सामन्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. २५ जून १९८३ साली भारताने प्रथमच विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता या स्पर्धेत कपिलदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र, या संघाने चमत्कार घडवून देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले.याच विश्वचषक सामन्यावर आधारित कबीर खान दिग्दर्शित '८३' हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -सुरेश वाडकर यांचा पद्मश्री पुरस्काराच्या यादीत समावेश
'८३' चित्रपटात रणवीरशिवाय आदिनाथ कोठारे, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार देखील भूमिका साकारत आहेत. या सर्व कलाकारांचे फर्स्ट लुक प्रदर्शित झाले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
माजी क्रिकेट कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांच्या भूमिकेत आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आणि सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. तर, आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, चिराग पाटील हा त्याचेच वडील संदीप पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा -धर्मेंद्र यांनी शेअर केला शेती आणि फार्म हाऊसचा व्हिडिओ
१० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.