मुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या लूकप्रमाणेच हटके भूमिकांसाठी अभिनेता रणवीर सिंगची ओळख आहे. आत्तापर्यंत त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आता अशाच एका हटके भूमिकेत तो पाहायला मिळणार आहे. गुजराती व्यक्तीच्या रुपात तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा फर्स्ट लूकही प्रदर्शित झाला आहे.
'जयेशभाई जोरदार' असे या चित्रपटाचे नाव आहे. मागच्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. दिव्यांग ठक्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, मनिष शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
हेही वाचा -आमिर खानने 'पानिपत' टीमला दिल्या यशासाठी सदिच्छा
या चित्रपटात रणवीर 'जयेशभाई'चे पात्र साकारत आहे. स्त्री- पुरूष समानता या विषयावर आधारित हा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये रणवीर भगव्या रंगाच्या एका प्रिंटेड शर्टमध्ये दिसत आहे. तर, त्याचा मागे डोक्यावरुन पदर घेतलेल्या काही महिला पाहायला मिळतात. रणवीरच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्याचा एकंदर लूक पाहता या चित्रपटाच्या कथानकाविषयी कुतूहल व्यक्त केलं जात आहे.
-
First look... #RanveerSingh in and as #JayeshbhaiJordaar... Set in #Gujarat, the film will see Ranveer play the role of a #Gujarati man... Directed by Divyang Thakkar... Produced by Maneesh Sharma... This will be Ranveer’s next release after #83TheFilm... #YRF presentation. pic.twitter.com/20D3JB3i19
— taran adarsh (@taran_adarsh) December 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">First look... #RanveerSingh in and as #JayeshbhaiJordaar... Set in #Gujarat, the film will see Ranveer play the role of a #Gujarati man... Directed by Divyang Thakkar... Produced by Maneesh Sharma... This will be Ranveer’s next release after #83TheFilm... #YRF presentation. pic.twitter.com/20D3JB3i19
— taran adarsh (@taran_adarsh) December 4, 2019First look... #RanveerSingh in and as #JayeshbhaiJordaar... Set in #Gujarat, the film will see Ranveer play the role of a #Gujarati man... Directed by Divyang Thakkar... Produced by Maneesh Sharma... This will be Ranveer’s next release after #83TheFilm... #YRF presentation. pic.twitter.com/20D3JB3i19
— taran adarsh (@taran_adarsh) December 4, 2019
हेही वाचा -राजकुमार हिराणी 'क्रिकेट'वर बनवणार दोन चित्रपट, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला