ETV Bharat / sitara

राणा दग्गुबाती-मिहिका बजाज यांचा साखरपुडा, जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव - मिहिका बजाज

राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज यांचा साखरपुडा पार पडलाय. ही बातमी आणि फोटो राणाने सोशल मीडियावर पोस्ट करताच सिनेजगतातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झालाय.

Rana Daggubati - Miheeka Bajaj engagement pics
राणा दग्गुबाती-मिहिका बजाज यांचा झाला साखरपुडा
author img

By

Published : May 21, 2020, 8:50 PM IST

हैदराबाद - तेलुगू स्टार राणा दग्गुबाती याने त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाज हिच्यासोबत एन्गेजमेंट केली आहे. लॉकडाऊनमध्ये झालेल्या या साखरपुड्यानंतर एक सुंदर फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राणाने फोटो शेअर करीत असताना कोणत्याही अफवा वाटू नये, यासाठी कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'हे अधिकृत आहे.'

Rana Daggubati - Miheeka Bajaj engagement pics
सिनेजगतातून जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव

राणाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षावच सुरू झाला. श्रृती हासनने लिहिलंय, 'मुबारकबात...' आणि लाल दिव्याचा इमोजी टाकलाय.

अभिनेत्री कृती खरबंदा हिनेही राणाला एन्गेजमेंटच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिया मिर्झानेही अभिनंदन केलंय.

मिहिकानेही जीवनातील या आनंदी क्षणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. एका फोटोत जोडपे बागेत फिरताना दिसत आहे. तर दुसऱ्यामध्ये राणी खुर्चीवर बसलेली मिहिका आपल्या प्रियकराच्या गालाचे चुंबन घेताना दिसत आहे.

राणा दग्गुबातीने काही दिवसांपूर्वी आपल्या नात्याबद्दल चाहत्यांना सांगितले होते. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.