मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंहने तिच्या मालदीवच्या सुट्टीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती फ्लायबोर्डवर उभी असल्याचे दिसत आहे. रकुलप्रीतने आपल्या फ्लायबोर्डिंग अनुभवाविषयी लिहिले आहे, " ७ वेळा पडले, ८ वेळा उठले...मी इथे ७० वेळा फ्लायबोर्डवरुन पडले." आपण वॉटर फ्रीक असल्याचे तिने म्हटलंय.
या फोटोला फोटो शेअरिंग वेबसाइटवर 1.05 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
हेही वाचा - या निवडणुकीत भाजपचा ''बोल्ड'' उडणार हे नक्की - पालकमंत्री सतेज पाटील
रकुलप्रीत सिंह ही अमिताभ बच्चन आणि अजय देवगन यांच्यासमवेत थ्रिलर चित्रपट 'मेडे'मध्ये काम करणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अजय देवगन करीत आहे. अभिनेत्री रकुल या चित्रपटात पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा - योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर, वातावरण तापले; मनसे, शिवसेना, काँग्रेसकडून लक्ष्य
डिसेंबरच्या मध्यापासून ती हैदराबादमध्ये 'मेडे' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.