मुंबई - बॉलिवूडमध्ये फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवणारा अभिनेता म्हणजे राजकुमार राव. अल्पावधीतच त्याने आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. राजकुमार देखील आपल्या भूमिकेसाठी तितकीच कठोर मेहनत घेताना दिसतो. त्याच्या एका चित्रपटासाठी राजकुमारने तब्बल २० दिवस गाजर आणि काळा चहा पिऊन आपला लूक चित्रपटातील पात्रासाठी तयार केला होता.
- View this post on Instagram
For the trailer launch of #जजMentalHaiKya. @thetyagiakshay @style.cell @sahilaneja @vijay.p.raskar
">
राजकुमारचा 'ट्रॅप' चित्रपट तर सर्वांना माहितच असेल. यामध्ये तो विचित्र अशा व्यक्तीच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात एक व्यक्ती त्याच्याच घरात अडकतो. त्याला खाण्यापिण्यासाठी काहीही मिळत नाही. या भूमिकेसाठी राजकुमारला रिअल लूक द्यायचा होता. अन्नपाण्याशिवाय एखाद्या व्यक्तीची कशाप्रकारे अवस्था होते, हे हुबेहुब दाखवण्यासाठी राजकुमारने २० दिवस फक्त गाजर खाल्ले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
याचा खुलासा त्यानेच एका मुलाखतीत केला होता. हा चित्रपट विक्रमादित्य मोटवानी यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटासाठी राजकुमारला फिल्मफेअर क्रिटिक्सकडुन उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता.
पत्रलेखानेही दिल्या खास शुभेच्छा -
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या नात्याच्याही बऱ्याच चर्चा पाहायला मिळतात. दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. आज राजकुमारच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">