मुंबई - अभिनेता राजकुमार राव नुकताच ज्येष्ठ अभिनेता परेश रावलसोबत गंभीर मूडमध्ये बुध्दिबळ खेळताना दिसला. राजकुमार राव याने परेश रावलबरोबर स्वतःचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला होता. ज्यात त्याने लिहिले आहे: "मास्टर प्लेयर परेश रावल सर यांच्यासमवेत बुद्धिबळपटू."
हेही वाचा - मला कडक अॅक्शनमध्ये हात आजमवायचा आहे - अनन्या पांडे
राजकुमार आणि परेश रावल अभिषेक जैन यांच्या आगामी 'सेकंड इनिंग्ज' या कॉमेडी चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात कृती सेनॉन आणि डिंपल कपाडियासुद्धा आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
राजकुमारचे दोन चित्रपट यावर्षी दिवाळीत प्रदर्शित झाले. एकीकडे तो अनुराग बासूच्या डार्क कॉमेडी 'लुडो' मध्ये दिसला. दुसरीकडे, हंसल मेहताच्या छलांग या चित्रपटाचा एक भाग होता. दोन्ही चित्रपट डिजिटल पद्धतीने प्रदर्शित झाले.
राजकुमार राव आगामी 'बधाई हो' आणि ' 'रूहीअफ्जा'मध्ये झळकणार आहे.
हेही वाचा - २०२१च्या ऑस्करसाठी भारताकडून मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू'ची निवड!