मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मागील तीन चार दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्या उपचार घेत आहेत. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन लतादीदींची भेट घेतली.
राज ठाकरे यांनी लतादीदींच्या प्रकृतीविषयी माहितीही दिली आहे. वयोमानामुळे लता दीदींना त्रास झाला होता, आता त्यांची तब्येत ठीक आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.
आज राज ठाकरे यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भेट घेतली, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
सोशल मीडियावरही त्यांनी ट्विट करुन लता दीदींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली होती.
-
दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय. @mangeshkarlata #getwellsoon
— Raj Thackeray (@RajThackeray) November 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय. @mangeshkarlata #getwellsoon
— Raj Thackeray (@RajThackeray) November 14, 2019दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय. @mangeshkarlata #getwellsoon
— Raj Thackeray (@RajThackeray) November 14, 2019