मुंबई - प्रभास स्टारर 'राधे श्याम'चा जागतिक प्रीमियर 1 एप्रिलपासून अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहायला मिळणार आहे. राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित आणि गोपी कृष्ण मुव्हीज प्रस्तुत आणि यूवी क्रिएशन्स निर्मित या रोमँस ड्रामामध्ये पूजा हेगडे, सचिन खेडेकर, प्रियदर्शी पुलीकोंडा, भाग्यश्री, जगपती बाबू, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर, रिद्धी कुमार, साशा छेत्री, सत्यान आणि इतरांच्याही भूमिका आहेत.
राधे श्याम एक पीरियड रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. यातील नायक विक्रमादित्य एक भव्य हस्तरेखाकार आहे जो नियती आणि प्रेरणावरील प्रेम यांच्यासाठी संघर्ष करतो. अभिनेत्री पूजा हेगडेने यात प्रेरणा ही व्यक्तीरेखा साकारली आहे. 'राधे श्याम'चा डिजिटल प्रीमियर 1 एप्रिलपासून तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये सुरू होईल. हिंदी भाषेतील ओटीटी रिलीजची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - काळ्या कपड्यातील जॅकलिन फर्नांडिसची चाहत्यांवर मोहिनी